Latest

बिस्कीट आणायला गेली आणि बनली करोडपती!

मोहन कारंडे

वॉशिंग्टन : एक महिला बिस्कीट खरेदी करायला घरातून निघाली होती. मात्र, घरी परतताना ती करोडपती होऊन आली आहे. बिस्किटे खरेदी करायला गेलेल्या महिलेचे अचानक मन बदलले आणि तिने 800 रुपये खर्चून लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. या लॉटरीत तिने 5.78 कोटी रुपयांची रक्कम जिंकली. कर कपात केल्यानंतर महिलेला चार कोटी रुपये मिळाले. या लॉटरीने ती मालामाल झाली.

अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना येथील विल्सन येथील रहिवासी असलेल्या डोना डेंटन यांनी 23 सप्टेंबर रोजी फ्रेमोंट फूड मार्टमधून 'ट्रिपल 777 लॉटरी तिकीट' खरेदी केले होते. ती खरंच बिस्किटे खरेदी करायला गेली होती; पण तिने अचानक लॉटरीची तिकिटे घेण्याचा निर्णय घेतला, असे डोना म्हणाली. जेव्हा तिने हे लॉटरीचे तिकीट स्क्रॅच केले तेव्हा तिचे नशीब पालटले. तिने या तिकिटातून सुमारे 6 कोटी रुपयांचा जॅकपॉट जिंकला. डोनाला तिच्या नशिबावर विश्वास बसत नव्हता, म्हणून ती घरी गेली आणि तिने तिच्या पतीला लॉटरी जिंकलेल्या गोष्टी पुन्हा एकदा तपासण्यास सांगितले. त्यानंतर पतीनेही तिने लॉटरी जिंकल्याचे सांगितले आणि दोघांचा आनंद गगनात मावेना!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT