Latest

WB Teacher recruitment scam : शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात सीबीआयचा गूगल सोबत पत्रव्यवहार

backup backup

नवी दिल्ली, ७ एप्रिल, पुढारी वृत्तसेवा : WB Teacher recruitment scam : सीबीआयाने पश्चिम बंगालमधील कोट्यवधी रुपयांच्या शिक्षक भरती घोटाळाच्या तपासासंदर्भात गूगल सोबत पत्रव्यवहार केला आहे. सीबीआयने गुगलला पत्र पाठवून या घोटाळ्यात वापरण्यात आलेल्या दोन बनावट संकेतस्थळांची माहिती मागितली आहे. प्रकरणाच्या तपासादरम्यान सीबीआयच्या अधिकाऱ्यांना पश्चिम बंगाल स्कूल सेवा आयोगाची (डब्ल्यूबीएसएससी) नकल करणाऱ्या दोन संकेतस्थळांची माहिती मिळाली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, (WB Teacher recruitment scam) सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी पत्र पाठवून सध्या बंद असलेल्या या संकेतस्थळांबद्दल माहिती मागवून घेतली आहे. हे संकेतस्थळ सुरू करण्यासाठी वापरण्यात आलेल्या ई-मेल अकांउटची माहिती देखील सीबीआयने मागितली आहे. यासोबतच संकेतस्थळ सुरू करण्यासाठी वापरण्यात आलेल्या गॅझेट्सच्या आयपी अॅड्रेस ची माहिती देखील सीबआयकडून मागण्यात आली आहे.

या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले तृणमूल काॅंग्रेसचे निष्कासित नेते कुंतल घोष यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी दरम्यान न्यायालयात सीबीआयच्या वकिलाकडून या दोन बनावटी संकेतस्थळांचा उल्लेख करण्यात आला. लेखी परीक्षेपूर्वीच नोकरीकरीता आगाऊ पैसे देणाऱ्यांची नावे या संकेतस्थळांवर अपलोड करण्यात आली. तसेच परीक्षेत निवड झाल्याचे दाखवण्यात आले होते, असे सीबअीायकडून सांगण्यात आले. (WB Teacher recruitment scam)

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT