Latest

बेलापूर येथील विजयस्तंभाचे लिंबू भारून पूजन करण्याचा प्रकार

अमृता चौगुले

बेलापूर; पुढारी वृत्तसेवा : येथील नुकतेच नूतनीकरण करण्यात आलेल्या विजयस्तंभाची लिंबू, काळे तिळ, हळद, कुंकू वाहून दोनदा पूजन केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराचा ग्रामस्थांकडून निषेध केला जात आहे. याचा योग्य तो तपास करून यामागे कोण आहे हे उघड करावे, अशी मागणी श्रद्धा संवर्धन समितीने केली आहे.

सदर प्रकार श्रद्धा संवर्धन समितीचे विष्णूपंत डावरे यांनी उघडकीस आला. 21 मार्च रोजी पहाटे सहा वाजता डावरे व त्यांचे सहकारी विजय स्तंभाजवळून जाताना त्यांना विजयस्तंभाजवळ लिंबू, काळे तिळ, हळद, कुंकू वाहून पूजन केल्याचे निदर्शनास आले. असाच प्रकार 28 मार्च रोजीही दिसून आला. डावरे यांनी सर्व पूजन साहित्य जमा करुन त्याची स्मशानभूमीत विल्हेवाट लावली.

स्वातंत्र्याचे साक्षीदार असलेल्या विजयस्तंभापाशी असा प्रकार करण्याचे नेमके कारण काय? हे समजलेले नाही. या प्रकारामुळे ग्रामस्थांनी चीड व्यक्त केली आहे. तसेच सदर प्रकार करणाराचा, पोलिस यंत्रणेने शोध घ्यावा. तसेच असले प्रकाराचा छडा लावून श्रद्धा संवर्धन समिती संबंधितांचा बंदोबस्त करील, असा इशारा डावरे यांनी दिला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT