Latest

वाशीम : समृद्धी महामार्गावर कारचा अपघात, सात गंभीर जखमी

स्वालिया न. शिकलगार

वाशीम : पुढारी वृत्तसेवा- समृद्धी महामार्गावर रोही (निलगाय) आडवे आल्याने कारचा अपघात झाला आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील पोहाजवळ लोकेशन १९० वर हा अपघात झाला. या अपघातात सात जण गंभीर जखमी झाले आहेत. कारच्या समोर अचानक रोही आल्याने गाडी चालकाने तात्काळ ब्रेक मारल्याने गाडीचे समोरील दोन्ही टायर फुटले आणि गाडी डिव्हायडरवर धडकली. जखमी हे चंद्रपूरचे राहणारे आहेत. शिर्डी येथून साईबाबाचे दर्शन करून चंद्रपूरसाठी जात असताना हा अपघात झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच १०८ लोकेशन कारंजा समृद्धी महामार्ग पायलट आतिष चव्हाण आणि डॉ. गणेश घटनास्थळी दाखल झाले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT