Latest

Central Sector Scheme : महिला बचत गटांना मिळणार शेतीसाठी ड्रोन; केंद्राची नवी योजना

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय मंत्रिमंडळाने महिला बचत गटांना औषध फवारणी ड्रोन पुरवण्यासाठी केंद्रीय क्षेत्र योजनेला मंजुरी दिली आहे. २०२३-२४ ते २०२५-२६ या कालावधीत १५ हजार निवडक महिला बचत गटांना कृषी वापरासाठीचे ड्रोन देण्यात येणार आहेत. हे ड्रोन बचत गटांकडून शेतकऱ्यांना भाड्याने दिले जातील. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी या निर्णयाची माहिती दिली.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, "गेल्या पाच वर्षांत सुमारे १३.५० कोटी भारतीय गरिबीच्या पातळीच्या वर पोहोचले आहेत. हे मोदी सरकारच मोठ यश आहे. कोविड-१९ महामारीच्या काळात, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना होती. ही योजना १ जानेवारी २०२४ पासून पुढील पाच वर्षांसाठी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे."

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT