Latest

मराठा आरक्षण घालवल्याबद्दल उद्धव ठाकरेंनी प्रायश्चित्त घ्यावे : ना. विखे पाटील

अमृता चौगुले

पुढारी वृत्तसेवा : पुण्यात आज कालवा समितीची बैठक पार पडली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह आमदार उपस्थित होते. यावेळी जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जबाबत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाष्य केलं. ते म्हणतात, " कालच्या  घटनेबाबत  राज्य सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. सर्वांनी शांतता ठेवावी. महाविकास आघाडी सरकारने हे आरक्षण घालवले तेच या घटनेचं राजकारण करत आहेत. त्यांनी मराठा आरक्षणाबाबत सतत नकारात्मक भूमिका घेतली आहे. समाजाला जाऊन भडकवण्याचा प्रकार करत आहेत.

पवार साहेब जेष्ठ नेते आहेत. दुष्काळी भागात दौऱ्यावर गेले असते तर समजू शकलो असतो. त्याठिकाणी जाऊन समाजाला आधार देण्याचं काम केलं पाहिजे, आधार देण्याचं काम करत असतील तर त्याला आमचा विरोध नाही. ते देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागण्याचा  पवार यांना नैतिक अधिकार नाही. मला एकतरी उदाहरण दाखवावे कि पवार यांनी मराठा समाजाच्या आरक्षणसाठी काय केले? ज्यावेळी आरक्षण घालवले त्यावेळी उद्धव ठाकरे यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता. त्याबरोबरच उद्धव ठाकरे यांनी काय दिवे लावले हे लोकांना कळले पाहिजे. सरकारी वकिलांना कागदपत्रे वेळेत दिले नाहीत. आंदोलन करणाऱ्या लोकांना सांगू इच्छितो की हे सगळे बोलघेवडे लोक आहेत, त्यांना केवळ राजकारण पेटवायचे आहे. आम्ही मराठा आरक्षण देण्यास कटिबद्ध आहोत.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT