Latest

Turkey-Syria earthquake : तुर्की-सीरिया भूकंपबळींची संख्या २४,००० च्या घरात

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाइन डेस्क :  तुर्कस्तान आणि सीरियाला हादरवलेल्या सोमवारच्या विनाशकारी भूकंपानंतर मृतांची संख्या किमान २४,००० वर पोहोचली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. भूकंपातील बळींची संख्या आणखी जास्त वाढण्याची शक्यता आहे. मृतांचा आकडा २३ हजारांच्या पुढे जाऊ शकतो, असा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेने वर्तविला  होता. (Turkey-Syria earthquake). एका वृत्तानूसार हिवाळ्यातील थंडीमुळे अन्नाची तातडीची गरज आहे.

सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या माहितीनूसार तुर्की आणि सीरियामध्ये भूकंपामुळे २४,००० हून अधिक मृत्यू झाले आहेत. तुर्की आणि सीरियामध्ये झालेला भूकंप हा दोन दशकांतील सर्वात भीषण भूकंप आहे. शुक्रवारी (दि.११) तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी अदियामान प्रदेशात प्रवास केला, जिथे त्यांनी कबूल केले की, "जरी आमच्याकडे सध्या जगातील सर्वात मोठी शोध आणि बचाव पथक आहे, परंतु हे वास्तव आहे की शोधमोहिम आम्हाला हवे होते तितक्या वेगाने होत नाहीत.

भौगोलिक स्थानापासून १० फूट सरकला

भूकंपाचा केंद्रबिंदूही तुर्कीत होता. येथील टेक्टोनिक प्लेटस् भूकंपानंतर १० फूट वर (३ मीटर) सरकल्या आहेत, असे तज्ज्ञांचे मत आहे. तुर्की हा देश अॅनाटोलियन, युरेशियन आणि अरेबियन या ३ टेक्टोनिक प्लेटस्च्या मध्ये वसलेला आहे. अॅनाटोलियन आणि अरेबियन प्लेटस् परस्परांपासून २२५ कि.मी. अंतर सरकल्या आहेत. परिणामी, तुर्की हा देश  आजवरच्या भौगोलिक स्थानापासून १० फूट सरकला आहे.

Turkey-Syria earthquake : ७ दिवसांचा राष्ट्रीय शोक

तुर्कीमध्ये ७ दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आला आहे. आठवडाभर सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद राहणार आहेत. २०० फ्लाईटस् रद्द करण्यात आल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या माहितीनुसार, तुर्कीत ११ हजार ३४२ इमारती कोसळल्या आहेत. तुर्कीमध्ये तीन ब्रिटिश नागरिक बेपत्ता आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT