Latest

Turkey-Syria Earthquake : एनडीआरएफच्या ज्युली आणि रोमियोने वाचवला चिमुकलीचा जीव

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाई डेस्क : तुम्ही श्वानांची माणसांशी असलेली मैत्री, प्रेम, आपुलकी, त्यांचा प्रामाणिकपणा याच्या बऱ्याच गोष्टी पाहिल्या असतील. तुम्ही आता ज्युली आणि रोमियो या श्वान जोडगोळीने केलेलं काम पाहून तुम्हीही नक्कीच भारावून जालं. तुर्की आणि सीरियाला हादरवलेल्या सोमवारच्या विनाशकारी भूकंपाने अख्ख्या जगाला हादरवून टाकले आहे. मृतांची आणि जखमींची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. बचाव पथके जीवाची पराकाष्ठा करुन भूकंपग्रस्तांचे प्राण वाचवत आहेत. याच भूकंपातील एका चिमूकलीला एका श्वान जोडगोळीने वाचवलं आहे. वाचा सविस्तर बातमी. (Turkey-Syria Earthquake )

तुर्की आणि सीरियाला हादरवलेल्या भूकंपाने जगाला हादरवलं आहे, दररोज जखमी आणि मृतांचा आकडा वाढत असताना दिसतं आहे. सीएनएनच्या वृत्तानूसार, आज (दि. १३, सकाळी १० पर्यंत) मृतांचा आकडा ३४ हजारांवर गेला. तर हा आकडा ५०,००० च्या घरात जावू शकतो, अशी भिती संयुक्त राष्ट्रांच्या (UN – United Nations) मदत विभागाचे प्रमुख मार्टिन ग्रिफिथ यांनी वर्तविली  आहे. जगभरातून तुर्की आणि सिरियाला मदतीचे हात समोर येत आहेत. कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अजून किती जीव तळमळत आहेत, गाडले आहेत याचा अंदाज नाही. ढिगाऱ्याखालून बचाव पथके जिवंत, मृत माणसं काढतं आहेत. दररोज मन हेलावणाऱ्या घटना समोर येत आहेत. अशीच एक ह्दय पिळवटून टाकणारी गोष्ट समोर आली आहे.

Turkey-Syria Earthquake : ज्युली आणि रोमियोच्या मदतीने शक्य

एनडीआरएफच्या (NDRF – National Disaster Response Force) ज्युली आणि रोमियोच्या श्वानांनी भूकंपग्रस्त नुरदागी शहरातील एका ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सहा वर्षांच्या मुलीला वाचवले आहे. तिचं नाव आहे नसरीन. एनडीआरएफने ज्युली आणि रोमियोला शोधमोहिमेसाठी सोडले. एका ढिगाऱ्याकडे जावून ज्यूलीने प्रथम भूंकुन संकेत दिला की इथे कोणीतरी आहे आणि ते जिवंत आहे. त्यानंतर रोमियोनेही भूंकुन खात्री दिली. त्यानंतर बचाव पथक कामाला लागले. तेव्हा ढिगाऱ्याखाली सहा वर्षीय नसरीन होती. मृत्यूशी झगडतं होती. अखेर तिला वाचवण्यात एनडीआरएफला यश आले. यात ज्युली आणि रोमियो यांची महत्त्वाची भूमिका होती.

तिची सुटका केल्यानंतर, नसरीनला लष्करी हेलिकॉप्टरने उपचारासाठी तुर्कीच्या हाताय येथील भारतीय लष्कराच्या फील्ड हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. तिची प्रकृती स्थिर असून ती बरी होत आहे. रोमिओ आणि ज्युलीचे हँडलर्स कमांडर गुरमिंदर सिंग माध्यमांशी बोलताना म्हणाले की, "ज्युली आणि रोमियो यांच्या मदतीशिवाय त्या चिमुरडीला जिवंत बाहेर काढता आले नसते.  ज्युलीनेच प्रथम संकेत देत  हँडलरला सावध केले. त्यानंतर रोमियोला आणण्यात आले. ढिगाऱ्याखाली दबलेली व्यक्ती जिवंत आहे."

तुर्कीमधील आतापर्यंतचा सर्वात विनाशकारी भूकंप

तुर्कीमध्ये आतापर्यंत बऱ्याचवेळा भूकंप झाले आहेत. आतापर्यंचे भूकंप पाहता फेब्रुवारी २०२३ मध्ये झालेला हा भूकंप सर्वात मोठा विनाशकारी आहे. यापूर्वी २७ डिसेंबर १९३९ ला तुर्कीमध्ये भूकंप झाला होता. त्याची तीव्रता ८.२ रिश्टर स्केल होती. यात तब्बल ३०,००० हून अधिक लोक मृत झाले होते. (Turkey earthquake updates)

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT