Latest

व्हायरल व्हिडिओ : डासांना पळवून लावायचा हा भन्नाट ‘जुगाड’ पाहाच

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन :  शहर असो की, गाव प्रत्येक ठिकाणी डासांमुळे लोक हैराण असतात. डास घातक आजारही पसरवतात. त्यांचा सामना करण्यासाठी लोक अनेक उपाय करतात.   इलेक्ट्रिक आणि बॅटरीवर चालणारी विविध उपकरणे वापरतात. तर काहीजण  कल्पनाशक्ती वापरून वेगवेगळे प्रयोग करत राहतात. असाच प्रयोग केलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्याला नेटकऱ्यांकडूनही प्रतिसाद मिळत आहे.

हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करताना, युजर्सने 'जुगाड ऑफ द ईयर… ईस साल का नोबेल पुरस्कार तो बनता है…' असे म्हटले आहे. आत्तापर्यंत हा व्हिडिओ ८३ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडिओवर एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, असे जुगाड गावात खूप पहायला मिळतात. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटले आहे, या धुरामुळे जनावरांना त्रास देखील होऊ शकतो.

व्हायरल व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने धूर केला आहे. तो पंख्याचा वापर करून सर्वत्र गोठ्यामध्ये पसरवला आहे. डास घालविण्यासाठी जरी धूर केला, तर तो जिकडे वाऱ्याची दिशा असेल तिकडेच पसरतो. त्यामुळे हे डास निघून जात नाहीत. पण या व्हिडिओमध्ये एक फॅन वेगाने फिरत असलेला दिसत आहे. फॅनच्या मागे कडुलिंबाची पाने धुमसत असून त्यातून धूर येत आहे. या धूराचे लोट हे फॅनमध्ये जाऊन ते सगळीकडे पसरत आहेत. धूर सगळीकडे व्यवस्थितरित्या पसरण्यासाठी हा फॅन लावण्यात आला आहे. जसा हा फॅन फिरतो तसा हा धूर इकडून सर्वत्र पसरू लागतो. त्यामुळे प्रत्येक कोपऱ्यात लपलेले डासही बाहेर येतात.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT