Latest

Terrorist Attacks : काश्मिरात दहशतवाद्यांकडून हिंदूंचे टार्गेट किलिंग; ६ ठार!

अमृता चौगुले

श्रीनगर; वृत्तसंस्था : जम्मू-काश्मीरमधील राजौरीलगतच्या डांगरी गावात दहशतवाद्यांनी सोमवारी आयईडी स्फोट घडवून आणला. त्यात दोघा चिमुरड्यांचा मृत्यू झाला आहे. 5 जण जखमी असून, 1 अत्यवस्थ आहे. सलग दुसर्‍या दिवशी दहशतवाद्यांनी हिंदूंना टार्गेट केले. याआधी रविवारी धांगरीतच लोकांना घराबाहेर काढून त्यांची ओळखपत्रे तपासून चौघा हिंदूंची दहशतवाद्यांनी निवडून हत्या केली होती. त्याच्या निषेधार्थ लोक सोमवारी निदर्शने करत असतानाच दहशतवाद्यांनी हत्याकांडाच्याच ठिकाणी पुन्हा स्फोट घडवून यंत्रणेला आव्हान दिले आहे. (Terrorist Attacks)

सोमवारच्या स्फोटातील मृतांची ओळख पटली असून, विहान कुमार (4), समीक्षा (16) अशी त्यांची नावे आहेत. डांगरीतील गावकर्‍यांनी सांगितले, की खोर्‍यात एकही हिंदू शिल्लक राहू नये, हीच दहशतवाद्यांची इच्छा आहे. रविवारी सायंकाळी गावात दहशतवादी आले तेव्हा त्यांनी लोकांना घराबाहेर बोलावले आणि सर्वांची ओळखपत्रे तपासली आणि निवडून हिंदूंना ठार केले. ज्या तीन घरांतील हिंदूंचे हत्याकांड काल झाले, त्यातीलच एका घरात आजचा स्फोट झाला, हे विशेष! रविवारच्या हत्याकांडानंतर दहशतवाद्यांनी या घरात आयईडी पेरून ठेवले असावे. घराची तपासणी यंत्रणांनी व्यवस्थित करायला हवी होती, असे खोर्‍यात बोलले जात आहे. (Terrorist Attacks)

टीआरएफने स्वीकारली जबाबदारी या हत्याकांडाची जबाबदारी (Terrorist Attacks)

द रेझिस्टन्स फ्रन्ट (टीआरएफ) या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआय, लष्कर-ए-तय्यबाने मिळून ती स्थापन केलेली असून, त्यात स्थानिकांचाही भरणा केला आहे.

नववर्षाची 4 घटनांनी सुरुवात

  • पहिली घटना : रविवारी सायंकाळी डांगरीतील दहशतवाद्यांच्या टार्गेट किलिंगमध्ये सतीश कुमार (45), प्रीतम लाल (56), शिवपाल (32), आनंदराम (26) यांचा मृत्यू झाला.
  • दुसरी घटना : रविवारीच सायंकाळी सहाच्या सुमारास हवाल चौकात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या 28 व्या बटालियनच्या बंकरवर ग्रेनेडने हल्ला केला. समीर अहमद हा युवक जखमी झाला.
  • तिसरी घटना : रविवारी दुपारी 12 च्या सुमारास पुलवामा जिल्ह्यातील राजपोरा भागात इरफान बशीर गनी या स्थानिक युवकाने एका सीआरपीएफ जवानाची एके-47 रायफल हिसकावून पोबारा केला.
  • चौथी घटना : सोमवारी सकाळी डांगरी येथे आयईडी स्फोट होऊन एका मुलीचा त्यात मृत्यू झाला.

मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख

मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रुपये मदत देण्यात येणार असून, मृतांच्या प्रत्येकी एका जवळच्या नातलगाला शासकीय नोकरी देण्यात येणार आहे, असे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी जाहीर केले.

दहशतवाद्यांचा शोध घेत आहोत. जवानांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली आहे.
मुकेश सिंह,एडीजीपी, जम्मू-काश्मीर

अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT