Latest

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात : बोरघाट उतरताना ब्रेक फेल झाल्याने ट्रक उलटला

अमृता चौगुले

लोणावळा : मुलांना शाळांना असलेल्या सुट्ट्या आणि उद्याच्या शनिवार, रविवारच्या सुट्ट्यांमुळे अनेक लोक आज पासूनच फिरण्यासाठी घराबाहेर पडले आहे. त्यात मुंबई महानगर व उपनगरातील लोक लोणावळा खंडाळा, महाबळेश्वर, कोल्हापूर याठिकाणी जाण्यासाठी पसंती देत असल्याने मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर वाहनांची संख्या वाढली असून वाहतूक कोंडी होण्यास सुरुवात झाली आहे.

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे वर पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर वाहनांची संख्या फार मोठ्या प्रमाणात असल्याने अवजड वाहनांसाठी झिरो अवर्सचा अवलंब केला जात आहे. छोट्या वाहनांची वाहतूक संथ गतीने सुरू असल्याने बोरघाट वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून अमृतांजन पुलाच्या दरम्यान झालेल्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लेनवर छोटे छोटे ब्लॉक घेऊन पुणे लेन वरील वाहतूक डायव्हर्ट करून पुणेकडे सोडण्यात येत आहे.

आज शुक्रवारी पहाटे 4 वाजण्याच्या दरम्यान मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर किलोमीटर 37 येथे पुण्याकडून मुंबई कडे जाणारा ट्रकचा (क्र. के.ए. 56 6150) ब्रेक निकामी झाल्याने चालकाचा ताबा सुटून ट्रक रस्त्यावर उलटला. या अपघातात ट्रकचा क्लीनर मुजफ्फर शेख यास किरकोळ दुखापत झाली. सदर अपघातात ट्रक तिसऱ्या लेन वर उलटल्याने त्याला पूलर आणि हायड्राच्या साह्याने काढले आहे. आय आर बी पेट्रोलिंग, बोरघाट वाहतूक पोलीस यंत्रणा, मृत्युंजय देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, लोकमान्य हॉस्पिटलची अँब्युलन्सनी तत्काळ मदतकार्य केल्याने घटनेची तीव्रता कमी झाली. खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT