Latest

धक्कादायक ! वयोवृद्ध शेतकर्‍याच्या खोट्या सह्या करीत काढले कर्ज

अमृता चौगुले

मंचर : पुढारी वृत्तसेवा :  वयोवृद्ध शेतकर्‍याच्या खोट्या सह्या घेऊन त्याच्या नावे सोसायटीतून 2 लाख 97 हजार 500 रुपये कर्ज काढून फसवणूक केल्याप्रकरणी लोणी (ता. आंबेगाव) येथील सोसायटीच्या सचिवासह भावकीतील सहा जणांवर पारगाव कारखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पोपट दत्तात्रय सिनलकर यांनी दिली आहे. रानमळा (ता. आंबेगाव) येथील फिर्यादी पोपट दत्तात्रय सिनलकर यांना भैरवनाथ विविध कार्यकारी सोसायटी लोणी येथे त्यांचे वडील दत्तात्रय सिनलकर यांच्या नावावर 2 लाख 97 हजार 500 रुपयांचा कर्जाचा बोजा दिसला.

याबाबत त्यांनी वडिलांना विचारले असता त्यांनी मी कोणतेही कर्ज घेतलेले नाही व कोणासही जामीन राहिलेलो नाही, असे सांगितले. त्या वेळी फिर्यादी पोपट सिनलकर यांनी सोसायटीच्या कार्यालयात सचिव निवृत्ती पोपट सिनलकर यांना त्याबाबत विचारणा केली असता त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. नंतर त्यांनी सांगितले की, तुमच्यावर कोणाचेही कर्ज नाही, तुम्ही साक्षीदार आहात.

संबंधित बातम्या :

फिर्यादी पोपट सिनलकर व त्यांच्या कुटुंबीयांनी याबाबत अधिक माहिती घेतली असता सन 2021 मध्ये त्यांचा चुलतभाऊ दिनकर सीताराम सिनलकर यास ट्रॅक्टर घ्यायचा होता व दिनकर यांच्या वडिलांच्या नावावर ट्रॅक्टरच्या किमतीएवढी जमीन नसल्यामुळे चुलतभाऊ दिनकर सीताराम सिनलकर, पुतण्या सुधीर दिनकर सिनलकर, विशाल दिनकर सिनलकर यांनी फिर्यादी पोपट सिनलकर यांच्या वडिलांच्या वयाचा गैरफायदा घेऊन कागदावर त्यांच्या सह्या घेऊन वडिलांचे नावे सोसायटीतून 2 लाख 97 हजार 500 रुपये कर्ज घेतले आहे, असे समजले.

याबाबत फिर्यादी पोपट सिनलकर यांनी दि. 23 फेब—ुवारी 2023 रोजी चुलतभाऊ दिनकर, पांडुरंग व दिनकर यांची मुले सुधीर व विशाल यांना कर्जाबाबत विचारणा केली असता त्यांनी 'तुम्ही सोसायटीमध्ये जायचे नाही, गेलात तर हातपाय मोडून टाकू' अशी धमकी दिली व शिवीगाळ केली. त्यामुळे पोपट सिनकर यांनी याबाबत वडिलांशी चर्चा करून तक्रार दाखल केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT