Latest

केवळ 43 दिवसांत बांधून पूर्ण झालं देशातील पहिलं 3 D प्रिंटेड पोस्ट ऑफिस

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाइन डेस्क : देशातील पहिल्या 3 D प्रिंटेड पोस्ट ऑफिसचं बेंगलुरूमध्ये उद्घाटन झालं. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्‍णव यांच्या हस्ते या पोस्ट ऑफिसचं उद्घाटन झालं. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सोशल मीडिया अकाऊंटवरुन या पोस्ट ऑफिसचे फोटो शेअर केले आहेत. बेंगलुरूच्या केंब्रिज लेआऊटमध्ये या पोस्ट ऑफीसची नवीन बिल्डिंग उभी आहे. या बिल्डिंगच खास वैशिष्ट्य म्हणजे केवळ 43 दिवसांत या इमारतीच बांधकाम पूर्ण केलं आहे. केंब्रिज लेआऊट पोस्ट ऑफिस  असं या बिल्डिंगला नाव दिलं गेलं आहे.

या 3 D प्रिंटेड पोस्ट ऑफिसला आयआयटी मद्रासने डिझाईन केलं आहे. या बिल्डिंग ला  लार्सन एंड टुब्रो कंस्ट्रक्शन कंपनीने थ्रीडी टेक्निक वापरुन बनवलं गेलं आहे. पंतप्रधान मोदी आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात, " बेंगलुरूमध्ये भारताचं पहिलं 3 D प्रिंटेड पोस्ट ऑफिस पाहून प्रत्येकाला भारतीयाला गर्व वाटेल. हे देशाच्या संशोधन आणि प्रगतीचं परिमाण आहे. हे आत्मनिर्भर भारताच्या भावनेचं प्रतीक आहे. हे डाकघर पूर्ण करण्यासाठी कष्ट घेतलेल्या प्रत्येकाचं अभिनंदन."

असं आहे हे पोस्ट ऑफिस… 

  • हे पोस्ट ऑफिस 1,021 चौरस फूट क्षेत्रफळावर आहे.
  • त्याचे बांधकाम 3D काँक्रीट प्रिंटिंग तंत्रज्ञान वापरून केले गेले आहे जे पूर्णपणे स्वयंचलित इमारत बांधकाम तंत्रज्ञान आहे.
  • यात रोबोटिक प्रिंटर मंजूर केलेल्या डिझाइननुसार काँक्रीटचा थर थर जमा करतो.
  • यासाठी पटकन कडक होणारे ग्रेड काँक्रीट वापरले गेलं आहे. याशिवाय हे काँक्रीट रचना प्रिंट करण्याच्या उद्देशाने स्तरांमधील बाँडिंग सुनिश्चित करण्यासाठी वापरले जाते.
  • हे पोस्ट ऑफिस बनवण्यासाठी 23 लाखांचा खर्च आला आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT