Latest

Suryakumar Yadav in T20 Cricket : सूर्यकुमारच्‍या नावावर नवा ‘विक्रम’, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय फलंदाज

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलमध्‍ये शनिवारी ( दि. २२)  पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा १३ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने २० षटकांअखेर ८ विकेट्स गमावत २१४ धावा केल्या. मुंबईचा संघ २० षटकांअखेर ६ विकेट्स गमावत २०१ धावाच करु शकला. मात्र, या सामन्यात मुंबईचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. सूर्यकुमार यादव टी २० क्रिकेटमध्ये सर्वांत वेगवान ६,००० धावा पूर्ण करणारा भारतीय खेळाडू बनला आहे. (Suryakumar Yadav in T20 Cricket)

सूर्यकुमारच्या टी२० क्रिकेटमध्ये ६,००० धावा पूर्ण

सूर्यकुमार यादवने टी२० क्रिकेटमध्ये ६,००० धावा पूर्ण केल्या आहेत. त्याने पंजाब किंग्ज विरोधात खेळताना २६ चेंडूमध्ये ७ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने ५७ धावा केल्या. याबरोबरच सूर्यकुमार सर्वांत वेगवान ६,००० धावा पूर्ण करणारा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने अनेक दिग्गजांना मागे टाकत त्‍याने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. सूर्यकुमारने ४०१७ चेंडूमध्ये ६ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. सूर्यकुमार पेक्षाही वेगाने ६,००० धावा पूर्ण करणाऱ्या खेळाडूंमध्ये आंद्र रसेल, ग्लेन मॅक्सवेल, क्रिस गेल यांचा समावेश आहे. (Suryakumar Yadav in T20 Cricket)

सर्वांत वेगवान ६,००० धावा पूर्ण करणारा भारतीय खेळाडू

सूर्यकुमार यादव सर्वांत वेगवान ६,००० धावा पूर्ण करणारा पहिला भारतीय खेळाडू बनला आहे. त्याने सुरेश रैनाला मागे टाकत हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. रैनाने ४२९५ चेंडूमध्ये ६ हजार धावा पूर्ण केल्या होत्या. सूर्यकुमार ६ हजार धावा पूर्ण करणारा ११ वा भारतीय फलंदाज ठरला आहे. या यादीत तिसरे नाव के. एल. राहुलचे आहे. त्याने ४३४२ चेंडूमध्‍ये ६ हजार धावा पूर्ण केल्‍या होत्‍या.  (Suryakumar Yadav in T20 Cricket)

टी२० क्रिकेटमध्ये सर्वांत वेगवान ६ हजार धावा पूर्ण करणारे खेळाडू

     चेंडू          खेळाडू
  • ४०१७  –  सूर्यकुमार यादव
  • ४२९५  –  सुरेश रैना
  • ४३४२  –  केएल राहुल
  • ४३९२  –  एमएस धोनी
  • ४५०१  –  दिनेश कार्तिक

(Suryakumar Yadav in T20 Cricket)

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT