Latest

बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित सुनील झंवरची गिरीश महाजनांच्या मुलीला लग्नाला हजेरी !

निलेश पोतदार

जळगाव ; पुढारी वृत्‍तसेवा : जळगाव जिल्ह्यातील बीएचआर बँक घोट्याळ्यातील मुख्य संशयित असलेला सुनील झंवर हा जामनेर येथे आमदार गिरीश महाजन यांच्या मुलीच्या लग्नाच्या कार्यक्रमात दिसून आला. यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

संपूर्ण देशात गाजलेला बी एच आर बँक घोटाळा यामध्ये तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारे व प्रमुख संशयित म्हणून सुनील झंवर यांची नावे समोर आली होती. यातील प्रमुख संशयित म्हणून सुनील झंवर याला नाशिक येथून अटक करण्यात आली होती. त्याच्यावर बीएचआर बँकेत अनेक भाईचंद हिराचंद रायसोनी अर्थात बीएचआर सहकारी पतसंस्थेतील गैरव्यवहाराने एके काळी प्रचंड खळबळ उडाली होती. या प्रकरणी तत्कालीन संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, बहुतांश संचालक अद्यापही कारागृहातच आहेत.

यानंतर बँकेवर जितेंद्र कंडारे यांना अवसायक म्हणून नेमण्यात आले. मात्र त्यांनी इतर दलालांना हाताशी धरून कोट्यावधींचा घोटाळा केल्याचे उघडकीस आले आहे. बीएचआर सहकारी संस्थेत आर्थिक गैरव्यवहार केल्या प्रकरणी २७ नोव्हेंबर २०२० रोजी पुणे येथे दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारे यांच्यासह व्यावसायीक सुनील झंवर यांचाही समावेश होता.

दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर झंवर हा फरार झालेला होता. त्याचे जामीन अर्ज अनेकदा नाकारण्यात आले होते. १० ऑगस्ट २०२१ रोजी त्याला पहाटे पोलिसांनी सुनील झंवर याला नाशिक येथून अटक केली होती. यानंतर सुनील झंवर याचा जामीन अर्ज अनेकदा नाकारण्यात आला होता. तथापी, सुनील झंवर याना 2022 च्या फेब्रुवारी महिन्यात जामीन मंजूर करण्यात आला आहे. तो आज आमदार गिरीश महाजन यांच्या मुलीच्या लग्नात दिसून आला. त्यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. झंवर हे आमदार गिरीश महाजन यांचे जवळचे कार्यकर्ते होते. त्यामुळे गिरीश महाजन यांच्या मुलीच्या लग्नात ते मंडपात दिसून आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT