Latest

Sikkim Avalanche: पर्यटकांवर काळाचा घाला; सिक्कीममध्ये हिमस्खलन, ७ जणांचा मृत्यू; १५० जण अडकल्याची भीती

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन: सिक्कीममधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ गंगटोक येथे आज (दि.०४) हिमस्खलन झाले. या नैसर्गिक आपत्तीमध्‍ये ६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तर ११ जण गंभीर जखमी झाले आहेत, असे वृत्त पीटीआयने दिले आहे. १५० हून अधिक पर्यटक अडकल्‍याची भीती प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. या नैसर्गिक आपत्तीतच मृत्यू झालेल्यांमध्ये चार पुरूष, एक महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. या दुर्घटनेत ११ हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्‍यक्‍त केली जात  आहे.

ही दुर्घटना आज दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी सिक्कीमधील गंगटोक ते नाथुला खिंडीला जोडणाऱ्या जवाहरलाल नेहरू मार्गावर घडली आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना झालेल्या ठिकाणाकडे जाण्यासाठी येथील पर्यटन प्रशासनाकडून पास दिले जातात. हे पास केवळ १३व्या मैलापर्यंतच जाण्यासाठी दिले जातात, परंतु पर्यटकांनी येथील प्रशासनाच्या परवानगीशिवाय १५व्या मैलाच्या दिशेने गेले. पंधराव्या मैलावरच हिमस्खलन होऊन ही नैसर्गिक आपत्तीची दुर्घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगटोक आणि नथुलाला जोडणाऱ्या जवाहरलाल नेहरू रस्त्यावरील १४ व्या मैलावर बचाव कार्य वेगाने सुरू आहे. रस्त्यावरून बर्फ हटवल्यानंतर येथून ३५० अडकलेले पर्यटक आणि ८० वाहनांची हिम ढिगाऱ्याखालून सुटका करण्यात आली. तसेच बर्फाखाली अडकलेल्या इतर ३० पर्यटकांना वाचवण्यात आले असून, त्यांना सिक्कीम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती समोर आली आहे.

J & K मधील 'या' जिल्ह्याला देखील हिमस्खलनाचा इशारा

जम्मू काश्मिरमधील कुपवाडा या जिल्ह्यात देखील पुढील २४ तासांत हिमस्खलन होण्याची शक्यता वर्तवली आहे. येथील भागात तापमान कमी झाल्याने धोक्याची पातळी निर्माण झाली आहे. त्यामुळे या भागात राहणाऱ्या लोकांना खबरदारी घेण्यासाठी सांगण्यात आले आहे. तसेच पुढील आदेशापर्यंत हिमस्खलन-प्रवण भागात जाण्याचे टाळावे, असा सल्ला जम्मू काश्मीर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिला आहे. (JKDMA)

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT