नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन
ख्यातनाम टीव्ही पत्रकार विनोद दुआ यांचे निधन झाले. गेल्या अनेक दिवस त्यांची मृत्यूशी झुंज सुरु होती. विनोद दुआ यांच्या कन्या मल्लिका यांनी सोशल मीडियात पोस्ट करून त्यांच्या निधनाला दुजोरा दिला.
मल्लिका यांनी सांगितले की, विनोद दुआ यांच्या पार्थिवावर लोधी स्मशानभूमीत उद्या (ता.०५) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मल्लिका दुआ यांनी सोशल मीडिया पोस्टवर लिहिले की, बेधडक, निडर आणि असाधारण वडील विनोद दुआ यांचे निधन झाले. दिल्लीच्या निर्वासित वसाहतीतून पत्रकारितेच्या शिखरावर पोहोचणारे ते अनोखे जीवन जगले. ते नेहमी सत्य सांगत राहिले. मल्लिका दुआ यांनी लिहिले आहे की, आता ते आमच्या आईसोबत म्हणजेच स्वर्गात पत्नीसोबत आहेत.