Latest

Senegal Bus Accident : सेनेगलमध्ये दोन बसचा भीषण अपघात, ४० ठार; ८५ हून अधिक जखमी

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : सेनेगल देशातील मध्य काफ्रीन प्रदेशातील धमनी रस्त्यावर दोन बसेसची समोरा-समोर धडक झाली. हा अपघात एवढां भीषण होता की यात  ४० लोकांचा मृत्यू झाला. तर  ८५ हून अधिक जखमी झाले. जखमींना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या अपघातस्थळी रस्ता मोकळा करुन वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे. एक निवेदन सादर करत सरकारने सोमवारपासून तीन दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर केला जाईल आणि देशभरात ध्वज अर्ध्यावर आणले जातील असे सांगितले आहे. (Senegal Bus Accident)

अधिक माहितीनुसार, सेनेगल देशातील मध्य काफ्रीन प्रदेशातील ग्निवी गावात राष्ट्रीय मार्ग क्रंमाक १ वर दोन बसेसचा भीषण अपघात झाला. यात ४० लोकांचा मृत्यू झाला. तर ८५ हून अधिक जखमी झाले. राष्ट्रीय अग्निशमन दलाच्या ऑपरेशनचे प्रमुख कर्नल चेख फॉल यांनी एएफपी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, जखमींना काफ्रीनमधील हॉस्पिटल आणि वैद्यकीय केंद्रात नेण्यात आले आहे व उपचार सुरु  केले आहेत. या अघातातात दोन्ही बस चक्काचूर झाल्या आहेत. अपघातस्थळी रक्ताच्या थारोळ्यात प्रवाशांच्या वस्तू अस्ताव्यस्त पडल्या होत्या. तज्ज्ञांच्या मते, सेनेगलमध्ये रस्ते अपघात सामान्य आहे. हे अपघात मुख्यत्वे ड्रायव्हरची चूक, खराब रस्ते आणि जीर्ण वाहनांमुळे होतात. अलिकडच्या वर्षांत एकाच घटनेतील सर्वात मोठी जीवितहानी झालेला हा अपघात सर्वात मोठा आहे.  

सरकारी वकील, चेख डिएंग यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, सुरुवातीच्या तपासात असे दिसून आले आहे की सार्वजनिक प्रवासी बसचा टायर फुटला आणि ती पलटी झाली. त्यानंतर विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुसऱ्या बसची समोरासमोर धडक झाली आणि हा भीषण अपघात झाला. राष्ट्राध्यक्ष मॅकी शाल यांनी यांनी दु:ख व्यक्त केले. त्याचबरोबर त्यांनी, "रस्ता सुरक्षेवर ठोस उपाययोजना करण्यासाठी" एक सरकारी परिषद आयोजित केली जाईल असंही सांगितलं आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT