सातारा : कास धरण ओव्हरफ्लो; सातारकरांची पाण्याची चिंता मिटली
निलेश पोतदार
सातारा ; पुढारी वृत्तसेवा; साताऱ्याची जलदेवता म्हणून संबोधले जाणारे कास धरण आज (शनिवार) पहाटे पूर्ण पणे भरले. धरणामध्ये (०.०३ टीएमसी) पाणीसाठा निर्माण झाला आहे. धरण भरल्यामुळे सातारकरांची पाण्याची चिंता मिटली आहे.