Latest

ऑनस्क्रीन वाचणे फायदेशीर; पण भविष्यात त्रासदायकही

Arun Patil

न्यूयॉर्क : कोरोना काळाने आपल्या जीवनात अनेक बदल घडले. या कालावधीत अनेकांनी ऑनस्क्रीन भरपूर वाचनही केले. मात्र, या पद्धतीने वाचणे जसे फायदेशीर आहे, तसेच त्यामुळे काही तोटे सोसण्याची तयारीही ठेवायला हवी.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा म्हणाले होते की, 'वाचनामुळे त्यांना स्वतःवर विश्वास ठेवायला आणि ते कोण आहेत हे समजायला मदत झाली.' वाचनाच्या सवयीमुळे ताण-तणाव कमी होतो, मेंदू सक्रिय राहतो आणि तुमच्या संवेदनेचा स्तरही सुधारतो. न्यूयॉर्कमधील द न्यू स्कूल फॉर सोशल रिसर्चच्या मते, पुस्तके वाचल्याने व्यक्तीच्या जीवनशैलीत मोठे बदल होतात. काळाच्या ओघात पुस्तकावर आधारित वाचन मागे पडून कॉम्प्युटर, टॅबलेट, मोबाईल, अशा डिजिटल उपकरणांवर वाचन सुरू झाले आहे.

स्मार्टफोनवर छोट्या बातम्यांचे अपडेटस् वगैरे आरामात वाचता येतात. मात्र, भावनिक आणि समजण्यास कठीण असलेल्या गोष्टी तुम्ही स्मार्टफोनवर वाचत असाल तर तुमची समजून घेण्याची क्षमता कमी होते, असे संशोधनात दिसून आले आहे. अर्थात डिजिटल माध्यमांतून वाचण्याचे काही फायदे आहेत. पुस्तकाची प्रत विकत घ्यायला गेले तर ती महाग मिळते. तेच पुस्तक कमी रकमेत ऑनलाईन वाचायला मिळते. त्याचवेळी बीबीसी रिलवर प्रकाशित झालेल्या 'व्हॉट डज रीडिंग ऑन स्क्रीन डू टू ऑर ब्रेन' या वृत्तानुसार, डिजिटलायझेशनच्या परिणामांवर संशोधन करण्यासाठी 30 हून अधिक देशांतील तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ एकत्र आले. या संशोधनात त्यांना काय आढळले, यावर नॉर्वेतील स्टॅव्हॅन्जर विद्यापीठातील प्रा. अ‍ॅनी मॅनगेन म्हणतात, स्मार्टफोनवर वाचलेली माहितीची समज पुस्तकाच्या तुलनेत कमी आहे.

अमेरिकेतील स्वयंसेवी संस्था 'सेपियन लॅब्स'च्या अहवालानुसार, लहान वयात मुलांना स्मार्टफोन दिला, तर त्याचे परिणाम तरुणपणात दिसून येतात. जेव्हा आपण कागदापेक्षा स्क्रीनवर वाचतो तेव्हा आपला मेंदू अधिक संसाधने वापरतो. तसेच आपण स्क्रीनवर जे वाचतो, ते दीर्घकाळ लक्षात ठेवणेदेखील कठीण जाते. त्यामुळे आपण कोणत्या माध्यमातून वाचतो यापेक्षा आपण काय आणि किती वाचतो हे महत्त्वाचे आहे. कारण, वाचनाचा परिणाम मानवी मनावर होत असतो. यामुळे तुमच्या मनात तयार होणारं द़ृश्य, भाषा, भावना जोडल्या जातात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT