Latest

RCB vs LSG : कमी धावसंख्येचा बचाव करण्यात आरसीबीला यश; लखनौचा १८ धावांनी पराभव

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : फॅफ डू प्लेसीसची ४४ धावांची खेळी, जॉश हेजलवुड आणि करन शर्माच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर आरसीबीने लखनौवर १८ धावांनी विजय मिळवला. हा सामना लखनौच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या आरसीबीने १२६ धावा केल्या आणि लखनौसमोर १२७ धावांची आव्हान ठेवले. आरसीबीच्या १२७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनौने अक्षरश: नांगी टाकली. आरसीबीच्या गोलंदाजांनी १२६ धावांचा यशस्वीरित्या बचाव केला.

लखनौकडून कृष्णाप्पा गौतमने १३ चेंडूमध्ये २३ आणि अमित मिश्राने ३० चेंडूमध्ये १९ धावा केल्या. गौतम आणि अमित मिश्रा शिवाय लखनौचा कोणताही खेळाडू खेळपट्टीवर टिकू शकला नाही. आरसीबीकडून जॉश हेजलवुड आणि करन शर्माने प्रत्येकी २ विकेट्स पटकावल्या. तर मोहम्मद सिराज, ग्लेन मॅक्सवेल, वहिंदू हसरंगा आणि हर्षल पटेलने प्रत्येकी १ विकेट पटकावली.

तत्पूर्वी, बेंगलोरकडून फॅफ डू प्लेसीस ४० चेंडूमध्ये ४४ धावा, विराट कोहली ३० चेंडूमध्ये ३१ धावा आणि दिनेश कार्तिकने ११ चेंडूमध्ये १६ धावांचे योगदान दिले. आरसीबीच्या इतर एकाही फलंदाजाला दोन अंकी धावसंख्या गाठता आली नाही. लखनौच्या गोलंदाजांनी सातत्याने विकेट पटकावत आरसीबीला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. लखनौकडून, नवीन उल हकने ३, रवी बिश्नोई आणि अमित मिश्राने प्रत्येकी २ तर कृष्णाप्पा गौतमने १ विकेट पटकावली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT