Latest

Qatar Fifa WC : इतिहासातील सर्वात महागडा फुटबॉल विश्वचषक: सुरक्षेसाठी सुमारे १७ लाख कोटींचा खर्च

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : कतारमध्ये २० नोव्हेंबरपासून फुटबाॅल विश्वचषक स्पर्धेला (Qatar Fifa WC) सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत जगभरातील ३२ संघ सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा पाहण्यासाठी सुमारे १५ लाख फुटबॉल चाहते कतारला पोहोचतील, असा अंदाज व्‍यक्‍त हाेत आहे. विश्वचषक स्पर्धेसाठी फिफा आणि यजमान कतार सुरक्षेसाठी सुमारे १७ लाख कोटी रुपये खर्च करणार आहेत. हा फुटबॉलच्या इतिहासातील सर्वात महागडा विश्वचषक असल्याचे बोलले जात आहे. स्पर्धेच्या सुरक्षेसाठी २४ लढाऊ विमाने असणार आहेत. फुटबॉलमधील सर्वात मोठ्या स्पर्धेची तयारी आणि वैशिष्ट्ये जाणून घेऊयात…

सुरक्षेसाठी ६५ हजार कोटींची लढाऊ विमानांची खरेदी

२०१७ मध्ये, कतारने ६५,००० कोटी रुपयांना २४ लढाऊ विमाने आणि ९ अत्याधुनिक हॉक एमके-१६७  जेट खरेदी करण्यासाठी युरोपमधील सर्वात मोठ्या सुरक्षा कंपनीशी करार केला होता. याशिवाय विश्वचषक स्पर्धेसाठी विविध कंपन्यांकडून हेलिकॉप्टर आणि सुरक्षा उपकरणेही खरेदी केली होती. (Qatar Fifa WC)

ब्रिटनचे १२ टायफून स्क्वाड्रन कतारमधील स्पर्धेच्या सुरक्षेत तैनात असणार आहेत.  ब्रिटन कतारला विशेष सुरक्षा देखील पुरवणार आहे. कतारचे राष्ट्रीय सुरक्षा केंद्र ड्रोन, सीसीटीव्ही आणि सेन्सरद्वारे स्पर्धेदरम्यान सर्वत्र लक्ष ठेवणार आहे. नाटो संघटनेचे देशही सैनिकांना प्रशिक्षण आणि व्हीआयपी सुरक्षा देण्यासाठी पुढे आले आहेत.

स्पर्धेदरम्यानच्या सेवांसाठी १६० देशांतील स्वयंसेवकांना प्रशिक्षण

दोन महिन्यांपूर्वीपासून कतारमध्ये २०,००० हून अधिक स्वयंसेवक विश्वचषकासाठी व्यस्त आहेत. हे स्वयंसेवक गेल्या काही महिन्यांपासून विशेष प्रशिक्षण ऑनलाईन आणि ऑफलाईन पध्दतीने करत आहेत. हे स्वयंसेवक १६० हून अधिक देशांमधून कतारमध्ये एकत्र आले आहेत.

'फिफाच्या म्हणण्यानुसार, कतार विश्वचषक स्पर्धेसाठी स्वयंसेवा करण्यासाठी सुमारे ४,२०,००० अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ५८,००० जणांच्‍या मुलाखती घेण्यात आली. त्यामधून २०,००० स्वयंसेवकांची निवड करण्यात आली. या स्वयंसेवकांची निवासाची आणि भोजनाची व्यवस्था 'फिफा'ने केली आहे. हे स्वयंसेवक वेगवेगळ्या स्टेडियममध्ये १० शिफ्टमध्ये वेगवेगळ्या विभागात काम करणार आहेत.

हेही वाचा;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT