Latest

युक्रेन युद्धामुळे जग निर्णायक टप्प्यावर

Arun Patil

मॉस्को, वृत्तसंस्था : दुसर्‍या महायुद्धात नाझीवर मिळवलेला विजयोत्सव (व्हिक्टरी डे) रशियाने मंगळवारी साजरा केला. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन क्रेमलिनहून लाल चौकात परेडमध्ये पोहोचले. यावेळी 10 मिनिटांच्या भाषणात पुतीन म्हणाले की, नाझींना पराभूत करून 78 वर्षे झाल्यानंतरही पुन्हा रशिया आणि जगाला धोका निर्माण झाला आहे. रशियाविरुद्धच्या खर्‍या युद्धाची आता सुरुवात झाली आहे. युक्रेनचे नेते जगासाठी नवे नाझीवादी आहेत. युक्रेनबरोबरच्या युद्धामुळे जागतिक समुदयाला एका निर्णायक टप्प्यावर आणून ठेवले आहे.

भविष्यात जगभरात रशियाला शांतता प्रस्थापित करावयाची आहे; पण हे पाश्चिमात्य देशांना नको आहे. ते नेहमीच रशियाच्या विरोधात द्वेष पसरवत आहेत. त्यांना रशियाला उद्ध्वस्त करायचे असून युक्रेनी जनतेला त्यांना गुलाम बनवावयाचे असल्याचेही पुतीन यावेळी म्हणाले. दरम्यान, रशियाच्या विजयोत्सव सोहळ्यात सहा देशांनी सहभाग घेतला. ते कधीकाळी सोव्हियत संघात समाविष्ट होते. यामध्ये कझाकिस्तान, किर्गिस्तान, आर्मोनिया, उझबेकिस्तान, तजाकिस्तान आणि बेलारूसचे नेते सहभागी झाले
होते.

10 हजार रशियन सैनिक सहभागी

या सोहळ्यात 125 लष्करी वाहने आणि 10 हजार रशियन सैनिकांनी परेड काढली. यामध्ये आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि एस-400 क्षेपणास्त्र सिस्टीमचा समावेश होता. काही दिवसांपूर्वी क्रेमलिनवर ड्रोन हल्ला केला होता. या पार्श्वभूमीवर लष्करी कसरती करण्यात आल्या नाहीत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT