Latest

महत्त्वाची बातमी ! वायू गळतीमुळे पुणे – नगर रस्ता राहणार दोन तास बंद 

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन :  पुणे – नगर महामार्गावर टँकर पलटी होऊन अपघात झाला आहे. यामुळे या रस्त्यावर मोठ्याप्रमाणात वायूगळती ही झाली आहे. या कारणास्तव संभाव्य धोका लक्षात घेता या मार्गावरील वाहतूक दोन तास बंद ठेवली जाणार आहे. अग्निशमन विभागाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून खबरदारीचा उपाय म्हणून या टँकरवर स्प्रे मारण्याचे काम सुरू आहे.  पहाटेच्या वेळी टँकर वडगाव शेरी चौकात आला असता रस्त्याच्यामध्ये पलटी झाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT