Latest

कोल्हापूर : ‘पीएसआय’ परीक्षेत सुप्रिया रावण, दीपाली कांबळे राज्यात प्रथम

Shambhuraj Pachindre

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2019 मध्ये घेतलेल्या पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदाच्या परीक्षेत सर्वसाधारण महिला प्रवर्गातून सुप्रिया मारुती रावण व गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील दीपाली रवींद्र कांबळे अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून राज्यात प्रथम आल्या आहेत. कोल्हापुरातील बापट कॅम्प येथील धनश्री विठ्ठल तोरस्कर यांनी ओबीसी स्पोर्टस् प्रवर्गातून राज्यात पाचवा क्रमांक मिळविला.
पोलिस उपनिरीक्षक 496 पदांपैकी 494 पदांचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यात जिल्ह्यातून 25 हून अधिक विद्यार्थी फौजदार बनले आहेत.

प्रियांका माने, अभिजित घोरपडे, सुशांत उपाध्ये, शंभू पाटील, रणजित कांबळे, रोहित जाधव, सारिका मरकड, विशाल गडकर, शीतल पाटील, रविकुमार पाटील, हैदर संदे, युवराज जगताप, प्रकाश सादळे, कुलदीप पोवार हे सर्वजण राज्य यादीत पहिल्या 111 क्रमांकाच्या आत उत्तीर्ण झाले आहेत.

दीपाली कांबळे या सर्वसाधारण कुटुंबातील असून, आई खासगी नोकरी करते. परीक्षा अंतिम निकालात राज्यात पहिला क्रमांक मिळविणे अनपेक्षित व आनंददायी आहे. राज्यसेवा परीक्षा देऊन क्लास वन पद मिळविण्याचा प्रयत्न असल्याचे त्या म्हणाल्या. मार्केट यार्ड येथील धनश्री तोरस्कर या शेतकरी कुटुंबातील आहेत. पीएसआय झाल्याचा आनंद आहे. पुढील परीक्षा देऊन पोलिस उपअधीक्षक होण्याचे स्वप्न असल्याचे त्यांनी सांगितले.

चुये (ता. करवीर) येथील प्रियांका माने यांनी एमपीएससीच्या पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले आहे. त्यांचे वडील निवृत्त मुख्याध्यापक, तर आई आरोग्य परिचारिका आहेत. राज्यसेवा परीक्षा देऊन मोठे पद मिळविण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. कुशिरे तर्फे ठाणे (ता. पन्हाळा) येथील अभिजित घोरपडे यांचे वडील सेेंट्रिंग काम करतात. दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पद मिळविल्याचा आनंद आहे. डीवायएसपी होण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT