Latest

औरंगाबाद : राहत्या घरात प्राध्यापकाची गळा चिरून हत्या

निलेश पोतदार

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : एकत्र कुटुंब पद्धतीत राहणाऱ्या प्राध्यापकाचा गळा चिरून खून करण्यात आला. रात्री झोपलेले कुटुंबीय सकाळी उठल्यानंतर हा प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ठाकरे नगर, एन-2, सिडको भागात ही घटना उघडकीस आली. डॉ. राजन शिंदे असे खून करण्यात आलेल्या प्राध्यापकाचे नाव आहे.

ते मौलाना आझाद कॉलेजमध्ये इंग्रजी विषय शिकवत होते. शिंदे हे एकत्र कुटुंब पद्धतीत राहत होते. रात्री कुटुंबीय झोपी गेले. सकाळी उठल्यावर त्यांना शिंदे हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. धक्कादायक म्हणजे घरातून काहीही चोरीला गेलेले नाही. त्यामुळे खुनाचे  कारण अद्याप समजलेले नाही. मुकुंदवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT