Latest

सिद्धेश्वर यात्रेतील वासराची भाकणूक : यंदा भरपूर पाऊस, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर राहतील

अमृता चौगुले

उत्तर सोलापूर, पुढारी वृत्‍तसेवा : सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धेश्वर यात्रेची ९०० वर्षाहून अधिक परंपरा आहे. या यात्रेवेळी मुख्य धार्मिक विधींना मोठे महत्त्व आहे. त्‍यापैकी एक म्‍हणजे वासराची भाकणूक. या वासराच्या भाकणुकीकडे शेतकऱ्यासह साऱ्यांचेच लक्ष असते. दरम्‍यान, सिद्धेश्वर यात्रेतील रविवारी रात्री होम हवन विधी झालेनंतर वासराच्या भाकणुकीचा कार्यक्रम रात्री १२.३५ वाजता फडकुले गेटसमोर सर्व मानकरी यांच्या समवेत हजारो नागरिकांच्या उपस्थितीत झाला.

संपूर्ण दिवसर मानकरी देशमुखांच्या वासरास संपर्ण दिवसभर उपाशी ठेवण्यात येते. भाकणुकीच्या रात्री त्याच्यासमोर गुळ, खोबरे, कडबा, गाजर आणि पाणी पिण्यास दिले जाते. यानंतर वासरांच्या खाण्यापिण्यावर व मलमूत्राच्या आधारावरून पाऊस, पाणी, महागाई आदी बाबत भाकणूक केली जाते.

भाकणूक 

सुरुवातीला वासराने मूत्र आणि मलविसर्जन केले. यावरून भरपूर पाऊस पडणार असल्याचे भाकीत हिरेहब्बू यांनी केले. वासरू सुरुवातीपासून बिथरले होते. यामूळे काहीतरी विचित्र घटनेचे संकेत त्यांनी दिले. वासरासमोर गूळ, गाजर, बोरं, खोबरं, खारीक, पान, सुपारी आणि विविध प्रकाराचे धान्य ठेवण्यात आले. वासराने कशालाच स्पर्श केला नाही. यावरून सर्वच वस्तूंच्या किंमती स्थिर राहतील.

हिरेहब्बू यांनी वासराच्या अंगावर तांदूळ टाकून त्याचे पुढे गुळ, खोबरे, कडधान्य ठेवले. पण वासराने कुठलेही धान्य व वस्तू खाल्ल्या नाहीत. यंदा अपेक्षा पेक्षा अधिक पाऊस पडणार असून, जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर राहतील. भाकणुकीच्या कार्यक्रमावेळी वासरु बिथरल्यानंतर उपस्थितांनी अस्थिरतेचा अंदाज व्यक्त केला.

आजपर्यंत यात्रेतील ही भाकणूक सत्यात उतरल्याचे हिरेहब्बू यांनी यावेळी सांगितले. सोलापूर शहर आणि जिल्ह्यावर कसलेच संकट येणार नसल्याचा विश्वास हिरेहब्बू यांनी भाकणुकीवेळी व्यक्त केला. वासराची भाकणूक संपताच रात्री उशिरा मानाचे सातही नंदीध्वज हिरेहब्बू वाड्याकडे मार्गस्थ झाले.

-हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT