Latest

प्रशांत किशोर मोठ्‍या घोषणेच्‍या तयारीत! सोनिया गांधी यांची घेतली भेट

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर लवकरच मोठी घोषणा करणार असल्‍याची संकेत आज मिळाले. त्‍यांनी काँग्रेस अध्‍यक्षा सोनिया गांधी यांनी भेट घेतली. यावेळी पक्षातील ज्‍येष्‍ठ नेते उपस्‍थित होते. त्‍यामुळे या बैठकीला महत्त्‍व प्राप्‍त झाले आहे.

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आज काँग्रेस प्रमुख सोनिया गांधी यांची भेट घेतली. यासंदर्भात माहिती देताना वेणुगोपाल यांनी सांगितले की, २०२४ मधील लोकसभा निवडणुकीच्‍या रणनीतीबाबत प्रशांत किशोर यांनी सोनिया गांधी यांच्‍याशी चर्चा केली. यावेळी मल्‍लिकार्जुन खर्गे, ए.के अँटनी, अंबिका सोनी, के सी वेणुगोपाल, जयराम रमेश, मुकुल वासनिक, दिग्‍विजय सिंह आणि अजय माकन उपस्‍थित होते.

प्रशांत किशोर यांनी मांडली २०२४ निवडणुकीची 'रणनीती'

प्रसिद्‍ध निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आज काँग्रेस अध्‍यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. यावेळी त्‍यांनी २०२४ मध्‍ये होणार्‍या लोकसभा निवडणुकीच्‍या रणनीतीचे सादरीकरणा केले. आता यासंदर्भातील अंतिम अहवाल पक्षाची समिती काँग्रेस प्रमुखांना सादर करेल, यानंतर यावर निर्णय घेतला जाईल, अशी माहिती काँग्रेस नेते के एस वेणुगोपाल यांनी दिली.

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आज काँग्रेस प्रमुख सोनिया गांधी यांची भेट घेतली. यासंदर्भात माहिती देताना वेणुगोपाल यांनी सांगितले की, २०२४ मधील लोकसभा निवडणुकीच्‍या रणनीतीबाबत प्रशांत किशोर यांनी सोनिया गांधी यांच्‍याशी चर्चा केली. तसेच यासंदर्भात माहिती काँग्रेसच्‍या समितीला देण्‍यात येणार आहे. यानंतर ही समिती याचा अहवाल पक्ष प्रमुख सोनिया गांधी यांना सादर करतील. यानंतर यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, प्रशांत किशोर यांची टीम गुजरातमध्‍ये सर्वेक्षण करत आहे. यापूर्वी त्‍यांनी राजस्‍थानचे मुख्‍यमंत्री अशोक गेहलोत यांची भेट घेतली होती. पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वीही प्रशांत किशोर यांनी काँग्रेसच्‍या ज्‍येष्‍ठ नेत्‍यांची भेट घेतली होती. याचचेळी ते लवकर काँग्रेसमध्‍ये सहभागी होतील, अशी शक्‍यताही व्‍यक्‍त करण्‍यात येत होते. मात्र यासंदर्भातील अधिकृत निर्णय झालाच नाही.

गुजरात-हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीवर लक्ष

उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा राज्‍यांमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला नामुष्‍कीजनक पराभवाला समोरे जावे लागले होते. या पराभवावर चिंतन करण्‍यासाठी काँग्रेस पक्षाने नुकतीच बैठक घेतली होती. यावेळी पक्षातील ज्‍येष्‍ठ नेत्‍यांनी पक्ष धोरणांवर नाराजी व्‍यक्‍त केली होती. तर सोनिया गांधी यांनी पक्षाच्‍या पुन्‍हा पुनर्बांधणी करण्‍यासाठी सर्वांची एकजूट हवी, असे आवाहन केले होते.

या वर्षाच्‍या अखेरीस गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणूक होणार आहे. दोन्‍ही ठिकाणी भाजप आणि काँग्रेस अशीच प्रमुख लढत असेल. लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षाला पुन्‍हा बळकटी देण्‍यासाठी या राज्‍यातील निवडणुका महत्त्‍वपूर्ण ठरणार आहेत.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT