Latest

पुणे-नगर महामार्गावर पीएमपीएमएल बसची समोरासमोर जोरदार धडक

अमृता चौगुले

पुणे/वडगाव शेरी  पुढारी वृत्तसेवा : पुणे-नगर महामार्गावर बीआरटी मार्गातील अपघाताचो सत्र संपेना. आज सकाळी पाएमपीएमएलच्या दोन बसची समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये जवळपास 29 प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहे. सुदैवानी कोणतेही जीवितहानी झाली नाही. वाघोली आगारातील कात्रज ते वाघोली बस वाघोलीच्या दिशेने चालली होती. न.ता.वाडी आगारातील तळेगाव ढमढेरे ते मनपा ही बस पुणे शहरा कडे चालली होती. या दोन्ही बस खराडी दर्गा आपले घर येथील बीआरटी थांबाच्या परिसरात समोरासमोर सकाळी ८.४५ च्या सुमारास धडकल्या.

बसचा वेग जास्त असल्याने इलेक्ट्रिक बसचा पुढील भाग अक्षरशः समोरील बस मध्ये घुसल्याने अनेक प्रवाशांना गाडीच्या काचा फोडून बाहेर काढावे लागले. तर इलेक्ट्रिक बसचा वाहन चालक गंभीर जखमी झाला आहे. यात ड्रायव्हर कंडक्टर सह २९ जण जखमी झाले त्यांच्यावर ससून येथे उपचार सुरू आहे. यामध्ये जखमींना हाताला तोंडाला पायाला मार लागला आहे. जखमी मध्ये आठ महिला असून सतरा प्रवासी व दोन्ही चालक व दोन्ही वाहक आहेत सध्या तरी कोणी गंभीर नाही . घटनेची माहिती मिळताच पोलीस व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले. घटनास्थळी पीएमपीएमल चे अधिकारी आले आहेत.

न.ता.वाडी डेपोची बस CNG 659 मार्ग क्रमांक 159/8 बस चालक क्र कायम 2682 बस क्रमांक एमएच 12 आर एन 6160 तळेगाव ढमढेरे ते मनपा येत असताना खराडी जनक बाबा दर्ग्याच्या अलीकडे बी आर टी मध्ये विरुद्ध दिशेने वाघोली डेपोची बस क्रमांक E 164 चालक क्र WT 322 मार्ग 236/2 ही बस (एम.एच.12 टिव्ही 5218) वेगात येऊन समोरून सीएनजी बसला धडकली

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT