Latest

Pm Modi On Manmohan Singh : PM मोदींकडून मनमोहन सिंग यांचे कौतुक, म्हणाले…

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: 'त्यांनी व्हीलचेअरवर बसून देखील राज्यसभेसाठी काम केले'. त्यांच्या या योगदानासाठी देश त्यांना लक्षात ठेवेल, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे कौतुक केले आहे. आज (दि.८) संसदीय अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान राज्यसभेत निवृत्त होणाऱ्या काही सदस्यांच्या निरोपाच्या भाषणात ते बोलत होते. या संदर्भातील वृत्त 'इंडिया टुडे'ने दिले आहे. (Pm Modi On Manmohan Singh)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राज्यसभेत बोलताना माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या योगदानाचे कौतुक केले आणि सिंग यांनी 'व्हीलचेअरवर बसूनही काम केले' असे सांगितले. राज्यसभेच्या निवृत्त सदस्यांच्या निरोपाच्यावेळी त्यांनी सभागृहाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी माजी पंतप्रधानांचे कौतुक केले आहे. (Pm Modi On Manmohan Singh)

डॉ. मनमोहन सिंग लक्षात राहतील

यावेळी पीएम मोदी म्हणाले की, "मला आज डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्याचे स्मरण करायचे आहे. त्यांचे योगदान खूप मोठे आहे. एवढ्या प्रदीर्घ काळापासून त्यांनी या सभागृहाला आणि देशाला ज्या प्रकारे मार्गदर्शन केले आहे. यासाठी डॉ. मनमोहन सिंग हे नेहमीच लक्षात राहतील…"  (Pm Modi On Manmohan Singh)

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT