Latest

PM Narendra Modi France Visit | ‘२०४७’ मध्ये विकसित भारत कसा असेल; PM मोदींच्या फ्रान्समधील वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीतील ठळक मुद्दे

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : PM Narendra Modi France Visit :'पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी सकाळी दिल्ली येथून आपल्या दोन दिवसीय फ्रान्स दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. पंतप्रधान मोदी १३ आणि १४ जुलै दरम्यान दोन दिवस फ्रान्स दौऱ्यावर आहेत. ते १४ जुलैला फ्रान्सच्या बॅस्टिल डे परेडच्या मुख्य सन्माननीय पाहुणे म्हणून सहभागी होतील. या दौऱ्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी फ्रान्सचे प्रसिद्ध वृत्तपत्र 'लेस इकोस' (Les Echos)ला नवीन दिल्लीतील प्रधानमंत्री निवासस्थानी त्यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी भारत @२०४७, रशिया युक्रेन युद्ध, जगातील दक्षिणी देश, संयुक्त राष्ट्र संघटनेच्या स्थायी सदस्यत्व आणि चीनच्या महत्वाकांक्षा या विविध मुद्द्यांवर महत्वपूर्ण भाष्य केले. वाचा मुलाखतीतील सविस्तर मुद्दे…(PM Narendra Modi France Visit)

PM Narendra Modi France Visit : भारत @२०४७

लेस इकोस या वृत्तपत्राने २०४७ साठी भारताचा दृष्टिकोन काय आहे? तसेच वैश्विक संतूलनात भारताच्या योगदानाला आपण कशा प्रकारे पाहता असा प्रश्न विचारला. या प्रश्नाचे उत्तर देताना मोदी म्हणाले, आमच्या स्वातंत्र्याच्या १०० व्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही २०४७ साठी स्पष्ट दृष्टीकोन ठेवून काम करत आहोत. २०४७ मध्ये भारताला विकसित देश बनवायचे आहे. विकसित भारत कसा असेल यासंदर्भात त्यांनी पुढील मुद्दे मांडले… (PM Narendra Modi France Visit)

भारत एक दोलायमान आणि सहभागी संघीय लोकशाही राहील, ज्यामध्ये सर्व नागरिकांना त्यांच्या हक्कांचे संरक्षण केले जाईल.
भारत एक अशी विकसित अर्थव्यवस्था असेल जी सर्व लोकांच्या शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि संधी अशा सर्व गरजा पूर्ण करेल.

  • नवोन्मेष आणि तंत्रज्ञानामध्ये भारत हा जगात आघाडीवर असेल.
  • भारत हा शाश्वत जीवनशैली, स्वच्छ नद्या, निळे आकाश आणि जैविविधतेने समृद्ध व वन्यजीवांनी समृद्ध असलेला देश आहे आणि राहील.
  • भारताची अर्थव्यवस्था संधीचे केंद्र, जागतिक विकासाचे इंजिन आणि कौशल्य आणि प्रतिभेचा स्रोत असेल.
  • भारत लोकशाहीच्या सामर्थ्याचा भक्कम पुरावा बनेल.
संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी सदस्यत्वाच्या मुद्द्यावर मोदींची भूमिका

संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी सदस्यत्वा संबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारले असता पंतप्रधान मोदी यांनी संयुक्त राष्ट्राच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले. तसेच त्यांनी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या स्थापनेला आठ दशक उलटले आहेत. या काळात जगात अनेक बदल झाले आहेत. अनेक नवीन शक्तींचा उदय झाला आहे. वैश्विक अर्थव्यवस्थेचे स्वरुप बदलले आहे. आपण नवीन तंत्रज्ञानाच्या काळात जगत आहोत. आमच्या समोरील आव्हाने देखील वेगळी आहेत. त्यापैकी जलवायू परिवर्तन, सायबर सुरक्षा, आतंकवाद, अंतरिक्ष सुरक्षा, महामारी ही प्रमुख आव्हाने आहेत.

अशा बदललेल्या वातावरणात दुसऱ्या विश्व युद्धानंतर स्थापित संयुक्त राष्ट्र संघटनेच्या संरचनेबद्दल प्रमाणिकपणे चर्चा होणे आवश्यक आहे. हा मुद्दा केवळ विश्वसनीयतेचा नाही. तर यापेक्षाही मोठा आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर अतिमहत्वपूर्ण प्रश्न देखील उपस्थित केले आहेत. त्यांनी संयुक्त राष्ट्र परिषदेतील विसंगतीवर बोट ठेवले. ते म्हणाले,

  • ते आजच्या जगाचे प्रतिनिधी आहेत का?
  • ज्या भूमिकेसाठी ते स्थापित करण्यात आले होते त्या भूमिका पार पाडण्यास ते सक्षम आहेत का? जगभरातील देशांना असे वाटते की या संस्था महत्त्वाच्या आहेत किंवा संबंधित आहेत?
  • विशेषतः संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद या विसंगतीचे प्रतीक आहे. आफ्रिका आणि लॅटिन अमेरिका या संपूर्ण खंडांकडे दुर्लक्ष केले जात असताना आपण जागतिक संस्थेचा प्राथमिक भाग म्हणून कसे बोलू शकतो?
  • सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आणि सर्वात मोठी लोकशाही असलेला देश कायमस्वरूपी सदस्य नसताना जगाच्या वतीने बोलण्याचा दावा संयुक्त राष्ट्र कसा करू शकतो?

असे प्रश्न उपस्थित करत ते पुढे म्हणाले की, त्याचे विषम सदस्यत्व अपारदर्शक निर्णय प्रक्रियेस कारणीभूत ठरते आणि आजच्या आव्हानांना सामोरे जाण्यात त्याची असहायता वाढवते. मला वाटते की बहुतेक देशांना भारताच्या भूमिकेसह संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कोणते बदल हवे आहेत याबद्दल स्पष्ट आहे. आपण फक्त त्याचा आवाज ऐकला पाहिजे आणि त्याच्या सल्ल्याचे पालन केले पाहिजे. या प्रकरणी फ्रान्सने घेतलेल्या स्पष्ट आणि सातत्यपूर्ण भूमिकेची मी प्रशंसा केली पाहिजे.

'या अन्य मुद्द्यांवरही चर्चा

या मुलाखतीत त्यांनी भारत-फ्रान्स संबंध, चीनच्या वाढत्या महत्वाकांक्षा, भारताला वैश्विक दक्षिणी देशांच्या नेतृत्वाची इच्छा आहे का? रशिया युक्रेन युद्धावर महत्वपूर्ण टिप्पणी या गोष्टींवर देखील या मुलाखातीत चर्चा करण्यात आली.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT