Latest

Parliament House BJP Meet : ‘इंडिया’ ही ‘घमंडी’ आघाडी; एकजुटीने उत्तर देऊ’ – PM मोदी

backup backup

नवी दिल्ली, ८ ऑगस्ट, पुढारी वृत्तसेवा, Parliament House BJP Meet : संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विरोधकांनी आणलेला अविश्वास प्रस्तावावरील चर्चेपूर्वी मंगळवारी संसद भवनात भारतीय जनता पक्षाच्या संसदीय दलाची बैठक पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा,राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासह सर्व केंद्रीय मंत्री आणि खासदार बैठकीत उपस्थित होते. बैठकीतून पंतप्रधानांनी विरोधकांवर शाब्दिक बाण सोडले. विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीला पंतप्रधानांनी घमंडांची आघाडी ठरवले. या घमंडी आघाडीला सर्वांना एकजुटीने उत्तर द्यावे लागेल,असे आवाहन मोदींनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. विरोधकांमध्ये अविश्वास व्याप्त आहे. हाच अविश्वास दाखवण्यासाठी त्यांनी अविश्वास प्रस्ताव आणल्याचे मोदी म्हणाले.

सोमवारी राज्यसभेत ही दिल्ली सेवा विधेयक पारित करून घेण्यास सरकारला यश आले. या निमित्ताने पंतप्रधानांनी बैठकीतून विरोधकांना शाब्दिक चिमटे घेतले. पंतप्रधान म्हणाले की, विरोधकांना उपांत्य सामना घ्यायचा होता. सोमवारी हा सामना झाला. याचा निकाल सर्वांसमोर आहे,अशा शब्दात पंतप्रधानांनी विरोधकांच्या एकजुटीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. Parliament House BJP Meet

पंतप्रधान म्हणाले की, काही लोकांना अत्यंत घमंड (Parliament House BJP Meet )आहे, तुष्टीकरणाचे राजकारण ते करीत आहे. विरोधकांसोबत कोण आणि कोण नाही, हे आता स्पष्ट होईल. घमंडींच्या आघाडीला आपण एकतेतून उत्तर देवू. आपण केलेली काम विशेषत: दलित आणि वंचितांसाठी केलेले कार्य जनतेपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचवून विरोधकांना उत्तर देता येईल. केलेल्या कामांचा प्रचार करा, असा कानमंत्र देखील मोदींनी खासदारांना दिला. बैठकीतून पंतप्रधानांनी 'क्विट इंडिया करप्शन' आणि 'क्विट इंडिया परिवारवाद' ची घोषणा दिली. भ्रष्टाचार आणि परिवारवादाला भारताबाहेर काढायचे आहे,असे पंतप्रधान म्हणाले. सामाजिक न्यायाची बात करणाऱ्यांनीच वंशवाद, तुष्टीकरण,भ्रष्ट राजकारणाने सर्वांचे नुकसान केल्याचे मोदी म्हणाले.

हे ही  वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT