Latest

बाल कर्करोग दिन : कर्करोगावर मात करत औरंगाबादच्या १७ वर्षीय परागची ४५ मॅरेथॉनमध्ये धाव !

निलेश पोतदार

औरंगाबाद ; पुढारी वृत्तसेवा : "जिंदगी की दौडमे रहो कॅन्सरसे दोन कदम आगे, इंडियाको जिंताना है, कॅन्सरको हराना है" जलद इलाज होने पर कॅन्सर ठिक हो सकता है" अशा आशयाचे फलक झळकावत १७ वर्षांचा पराग कर्क रोगावर यशस्वीपणे मात करण्यासाठी इतरांनाही संदेश देत प्रोत्साहित करत असतो.

औरंगाबाद शहरासह राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय धावण्याच्या स्पर्धेत जलदगतीने रनिंग करत कर्करोग मुक्तीचा स्वतः यशस्वीपणे अनुभव घेत अनेक मॅरेथॉन गाजविणारा पराग श्रीनिवास लिगदे हा तरूण सशक्त आत्मविश्वास आणि प्रबळ इच्छाशक्ती यांच्या जोरावर कर्करोगमुक्त समुहांचा आयकॉन बनला आहे. कॅन्सर सारख्या असाध्य रोगाशी लढत मृत्यूच्या दाढेतून यशस्‍वीपणे बाहेर पडलेल्या परागचा प्रवास खडतर आहे.

सहाव्या वर्षी कॅन्सर, धावण्याने दिली ऊर्जा…

मुळचे बीड बायपास, सातारा येथील श्रीनिवास व वैशाली लिगदे यांचा तो एकुलता एक मुलगा. वयाच्या सहाव्या वर्षी त्याला कॅन्सरने गाठले. तेव्हा त्याच्या आई-वडिलांची अवस्था दोलायमान झाली. खेळायच्या वयात कर्करोगाने विळखा घातल्‍यावर २०११ पासून परागवर उपचार सुरू होते. तसेच त्‍याला ब्रेन ट्युमर हायपोथॅलयामिक ग्लायोमा झाला. यावरील उपचारासाठी दर आठवड्याला केमोथेरपी करावी लागत असे.

हार्मोन्सची २२ इंजेक्शन…

परागवरील केमोथेरपी उपचारावेळी बालवयात त्याच्या शरीराने असह्य वेदना सहन केल्या. केमोथेरपी घेतल्यावर शरीराचा दाह, झोप गायब होणे. हार्मोन्सची तब्‍बल बावीस इंजेक्शन त्‍याने घेतले‌ली आहेत.अजुनही त्यास उपचारासाठी मु़बईला जावे लागते. आतापर्यंत ब्रेन स्पाईनचे सतरा एम आयआर, पायाचे दहा एक्सरे, सकैनोग्राम करत पराग कर्क रोगाशी प्रबळ इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर दोन हात करत राहिला.

धावणे, सायकलिंगने दिली ऊर्जा.. 

मेंदूवर कर्करोगाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर आठ महिने फिजिओथेरपी करत परागने आई, वडीलांच्या प्रोत्साहनामुळे धावण्याचा सराव सुरू केला, पुढे तो थेट व्यावसायिक धावपटूही बनला. २०१७ पासून औरंगाबाद, मुंबई, पुणे, जालना आदी शहरांमध्ये त्याच्या मॅरेथॅानचा प्रेरणादायक प्रवास सुरू झाला.

गेट गोइंग, सीएम चषक, दिव्यांग रन, एमजीएम, बारामती आंतरराष्ट्रीय ते टाटा मुंबई, अंबरनाथ आदी स्पर्धेत जलदगतीने रनिंग करत कर्करोगमुक्त म्हणून परागने समाजातील अशा लोकांना प्रेरणा दिली.

माझ्या आई-बाबांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही त्यांनी माझ्यावर उपचार करत जगण्याचे बळ दिले. कर्करोगमुक्त होण्यासाठी डॉक्‍टरांचे प्रयत्न यासह रनिंगमध्ये ठसा उमटविला. सायकलिंगचाही लाभ झाला. मला या दोन्ही खेळात खूप पुढे जायचे असून, स्वबळावर यशस्वीपणे जगायचे आहे. आई, वडील आणि डॉक्टर यांच्या प्रयत्नातून परिश्रमानेच मला उभारी मिळाली आहे.

– पराग श्रीनिवास लिगदे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT