Latest

Oil prices | आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात १ टक्के वाढ, जाणून घ्या कारण

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : कमी पुरवठ्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती जवळपास १ टक्के वाढल्या आहेत. जर्मनीची मंदावलेली अर्थव्यवस्था, मजबूत डॉलर आणि अमेरिकेची फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरवाढीच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाचे दर वाढले असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. (Oil prices)

शुक्रवारी ब्रेंट फ्युचर्स ९६ सेंट म्हणजेच १.२ टक्के वाढून प्रति बॅरल ८४.३२ डॉलर झाले. तर यूएस वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (WTI) क्रूड ७८ सेंट्स म्हणजे १ टक्के वाढून प्रति बॅरल ७९.८३ डॉलरवर पोहोचले.

गेल्या आठवडाभरात ब्रेंट सुमारे १ टक्के आणि WTI सुमारे २ टक्क्यांनी खाली आले होते. गेल्या आठवड्यात दोन्ही बेंचमार्क सुमारे २ टक्क्यांनी घसरले होते. युरोपमधील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेली जर्मनीची अर्थव्यवस्था कमकुवत झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. त्यात इतर चलनांच्या तुलनेत अमेरिकी डॉलर पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. तसेच फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांना वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी आणखी व्याजदर वाढीची शक्यता व्यक्त केली आहे. यामुळे वाढीव व्याजदर अर्थव्यवस्थेची गती मंदावू शकतो आणि परिणामी तेलाची मागणी कमी होऊ शकते. मजबूत झालेला डॉलर इतर चलनांसाठी तेल खरेदी अधिक महाग करून मागणी कमी करू शकते, असे रॉयटर्सने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज (OPEC) आणि रशिया सारख्या सहकारी देशांनी २०२२ च्या उत्तरार्धात बाजाराला चालना देण्यासाठी पुरवठा मर्यादित करण्यास सुरुवात केली होती आणि जूनमध्ये २०२४ पर्यंत मर्यादित पुरवठा कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT