Latest

Nashik Leopard News : बंद वसाका कारखान्यात वसलय बिबट्याचे कुटुंब, कितीतरी पाळीव प्राण्यांचा फडशा, परिसरात दहशत

गणेश सोनवणे

देवळा ; पुढारी वृत्तसेवा-  बंद अवस्थेत असलेल्या वसाका कारखान्यात एक नर आणि मादी त्यांचे दोन बछडे असा परिवार असलेल्या बिबट्यांच्या कुटुंबाचा मुक्त संचार वाढला आहे.  यामुळे वसाका कार्यस्थळाच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने याची तात्काळ दखल घेऊन ह्या बिबट्यांच्या बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे. (Nashik Leopard News)

वसाकाच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती, परंतु सद्या सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले आहे, देवळा तालुक्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.. शेतकरी माय बाप जनतेला कोणी वाली आहे का ? हा प्रश्न विचारला जातो आहे. लोहोणेर, विठेवाडी, सटवाइवाडी वसाका कामगार वसाहत, रमाबाई नगर, परिसरात बिबट्यांचा मुक्त संचार सुरू आहे. सर्व सामान्य जनता भयभयीत झाली आहे. बकऱ्या, लहान मुले, छोटे मोठे जनावरे बाहेर मोकळ्या जागेत असतात. बिबट्या ने आत्ता पर्यंत अनेक पाळिव जनावरांचा पडशा पाडला आहे. परिसरातील जनता जीव मुठीत धरून जगत आहे. (Nashik Leopard News)

लोहोणेर वसाका विठेवाडी, परिसरात गेल्या दोन-तीन महिन्यापासून चार ते पाच बिबट्यांची टोळी करून एकत्र येऊन फिरत आहेत.  यावर्षी पाऊस कमी पडल्यामुळे शेतीमध्ये लावलेल्या कांद्याचे पिक जगवण्यासाठी पाणी भरण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रीचा दिवस करावा लागतो आहे. कमी प्रमाणात लाईट असल्यामुळे शेतकरी दिवस रात्र एक करून जिव मुठीत धरून जगत आहे. त्यात सर्व विहिरीने देखील तळ गाठला असून, शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय वाईट आहे. अशा परिस्थितीमध्ये बिबट्यांचे मोठ संकट शेतकऱ्यांवर येऊन उभं राहिलेल आहे.
परिसरात बिबट्यांचा वावर असताना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ रेस्क्यू आपरेशन करावे अशी मागणी स्थानिक नागरिक कुबेर जाधव यांनी केली आहे .

बायका पोरांवर हल्ला केल्यावर रेस्क्यू करणार का? (Nashik Leopard News)

बिबट्यांच्या टोळक्याने शेतकऱ्यावर किंवा लोकांच्या घरात घुसून व बाहेर फिरायला निघणाऱ्या बायका पोरांवर प्राण घातक हल्ला केल्यानंतर वन विभाग रिस्क्यू ऑपरेशन करणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान वनपरिक्षेत्र अधिकारी कौतिक ठुमसे यांच्याशी दुरध्वनीवर संपर्क केला असता येत्या २४ तासात वरिष्ठांशी संपर्क साधुन रेस्क्यू आपरेशन बाबतीत निर्णय घेतला जाईल असे सांगण्यात आले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT