Latest

Nashik : माजी सैनिकाने सापडलेला एक लाख रुपयांचा धनादेश केला परत

गणेश सोनवणे

देवळाली (जि. नाशिक) : कॅम्प पुढारी वृत्तसेवा 

लहवित गावचे रहिवासी असलेले व सध्या भगुर येथील राधा बाळकृष्ण नगर येथे वास्तव्यास असलेले माजी सैनिक दशरथ सुखदेव वाघमारे यांचे परिसरात सध्या कौतुक होते आहे. त्याला कारणही तसेच आहे. दशरथ यांनी त्यांना सापडलेला तब्बल एक लाख रुपयांचा धनादेश हा बॅक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक यांच्याकडे सुपुर्द केला आहे. त्यांनी दाखवलेला हा प्रामाणिपणा आदर्श घेण्यासारखाच आहे.

दशरथ वाघमारे हे एका विवाह समारंभासाठी भगुर येथून घोरवडकडे जात असताना विंचुरी बस स्टॉप जवळील रस्त्यावर त्यांना बँक ऑफ इंडियाचा दुर्गा कृषी सेवा केंद्र या नावाने एक लाख रुपयांचा बेरर चेक सापडला. त्यानंतर ते धनादेश घेऊन देवळाली कॅम्प येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गेले. तेथे व्यवस्थापक विजया कुरुप यांच्याकडे त्यांनी तो सुपुर्द केला. त्यानंतर खातेदाराची चौकशी केली असता तो धनादेश आगसखिंड येथील शहीद सैनिक खंडू भागुजी बरकले यांचा असल्याचे कळाले.  यावेळी दशरथ वाघमारे यांनी बरकले यांच्या परिवाराशी संपर्क साधून शहीद बरकले यांच्या पत्नी व मुलगी सह भाऊ भाऊसाहेब भागुजी बरकले यांच्याकडे हा धनादेश सुपुर्द केला.

देशासाठी शहीद झालेल्या खंडूजी बरकले यांचा एक लाखाचा धनादेश एका माजी सैनिकाला सापडला. दशरथ वाघमारे या माजी सैनिकांनी आपला प्रामाणिकपणा दाखवत कुठलाही लोभ न ठेवता तो धनादेश परत दिल्याने भगुर सह लहवीत परिसरात दशरथ वाघमारे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT