Latest

राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ नाशिक काँग्रेस रस्त्यावर

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मोदी आडनावावर टीका केल्या प्रकरणी सुरत न्यायालयाने गुरुवारी (दि. २३) काॅंग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दाेन वर्षांची शिक्षा ठाेठवली. त्यानंतर तत्काळ गांधी यांना न्यायालयाने जामीनही मंजूर केला. मात्र, न्यायालयाच्या निर्णयाचे पडसाद सर्वत्र उमटले. नाशिकमध्ये एमजी रोड येथे राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदविला.

सुरत न्यायालयाने ज्या कारणासाठी राहुल गांधी यांना शिक्षा सुनावली. ते कारण ग्राह्य मानले, तर दर क्षणाला एकमेकांचा उद्धार करणारे राजकीय नेते आणि त्यांना वेगवेगळ्या उपाध्या देऊन कोसणारी जनता सगळ्यांनाच शिक्षा व्हायला हवी. सध्या देशात लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम मोदी सरकार करत आहे. राहुल गांधी हे वारंवार मोदी सरकारविरोधात आवाज उठवत आहे. त्यांच्या भारत जोडो यात्रेला मिळालेल्या प्रतिसादामुळे राहुल गांधी यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

यावेळी अल्पसंख्याक शहराध्यक्ष हनिफ बशीर, सेवादलाचे शहर अध्यक्ष वसंत ठाकूर, माजी नगरसेविका वत्सला खैरे, आशा तडवी, महिला शहराध्यक्षा स्वाती जाधव, एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष अल्तमश शेख, ओबीसी शहराध्यक्ष गौरव सोनार, सचिव फारूक मन्सूरी, जावेद इब्राहिम, जुली डिसोझा, अनिल बहोत, कुसुम चव्हाण, समिना पठाण, साजिया शेख, अरुणा आहेर, सारिका कीर, सागर वाहूळ, दाऊद अब्दुल गणी शेख, दाऊद शेख, राजेंद्र हिवाडे, ज्ञानेश्वर काळे, इसाक कुरेशी आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT