Latest

नाशिक : शिवबाच्या जन्मोत्सवासाठी दोन वर्षीय शिवकन्येचा खारीचा वाटा

अंजली राऊत

नाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा

स्त्री म्हणजे शिवबाची तलवार, स्त्री म्हणजे दुर्गाचा अवतार… अशा रणरागीणी स्त्रीचे तळपते रुप … शिवजन्म सोहळ्यानिमित्ताने अवघ्या दोन वर्षाच्या चिमुरडीने आपल्या खाऊचे पैसे शिवरायांच्या जन्मोत्सवासाठी खारीचा वाटा म्हणून हसत हसत दिले आहेत.

नाशिकरोड परिसरातील दोन वर्षीय शिवकन्या आर्या शंतनु निसाळ हीला आपल्या नातेवाईकांकडून, आई-वडिलांकडून आणि आजी-आजोबांकडून वर्षभर खाऊसाठी पैसे मिळाले. या पैशांचा उपयोग चिमुरडीने आपल्या लाडक्या शिवबाच्या जन्मोत्सव साजरा करण्यासाठी देऊ केले आहेत. शिवजन्मोत्सव सोहळा समितीसाठी ही देणगी सुपूर्द करण्यात आली आहे. त्यासाठी देखील ही शिवकन्या सर्वप्रथम लाडक्या शिवबाचरणी नतमस्तक होऊन त्यानंतर मोठ्या दिलदार मनाने ही देणगी मान्यवरांकडे सुपूर्द करत आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT