Latest

नारायणगाव : दुचाकी-ट्रेलर अपघातात सख्खे भाऊ ठार

अविनाश सुतार

नारायणगाव; पुढारी वृत्तसेवा: नारायणगाव-शिरूर रस्त्यावर वळणवाडी -मांजरवाडी दरम्यान ट्रेलर-दुचाकी धडकेत सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्घटना आज (दि. १५) सकाळी घडली. जखमीवर नारायणगाव रूग्णालयात उपचार सुरु आहेत.

रामदास दशरथ केदारी (वय ४२) आणि नारायण दशरथ केदारी (वय ४०) असे या अपघातात मृत झालेल्या सख्‍ख्‍या भावांची नावे असून, पोपट काळे हे या अपघातात गंभीर जखमी झाले. रामदास केदारी हे पुणे येथे रास्ता पेठेत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीत नोकरीला होते.

रामदास व नारायण हे मांजरवाडी येथे बाजरीच्या काढणीसाठी निघाले होते. यावेळी त्यांच्याबरोबर पोपट काळेही होते. नारायणगाव येथून ते मोटारसायकलने (एमएच १४ एचएक्स १४६०) मांजरवाडीच्या दिशेला जाताना ट्रेलर (एमएच ४६ एआर १२११) त्यांच्या दुचाकीला धडकला. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून, नारायणगाव पोलिसांनी ट्रेलर चालकाला ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT