Latest

Ancient lava : प्राचीन लाव्हात आढळला रहस्यमय घटक

Arun Patil

ओटावा : 'हेलियम-3' सौर वार्‍यातील एक शोध घटक आहे आणि चंद्राच्या पृष्ठभागाने पृथ्वीवर आढळलेल्या हेलियम-3 पेक्षा जास्त प्रमाणात शोषले आहे. हेलियम -3 पृथ्वीवर अतिशय दुर्मीळ आहे. नियमित हेलियमच्या प्रत्येक 10 हजार अणूंमागे फक्त तीन अणू इतके ते दुर्मीळ आहे. चंद्रावर मात्र त्याचे प्रमाण सामान्य मानले जाते. याच पार्श्वभूमीवर, संशोधकांना प्राचीन लाव्हामधून एक रहस्यमय तत्त्व मिळाले असून, या माध्यमातून हेलियम-3 चे अंश आढळून आले आहेत.

कॅनडातील आर्कटिक बेट समूहातील बाफिन बेटावर प्राचीन लाव्हाचा एक प्रवाह संशोधकांना मिळाला होता. याचे अधिक परीक्षण केले असता त्यात हेलियम-3 मोठ्या प्रमाणात आढळून आले. पृथ्वीच्या अंतभार्गात हा एक दुर्मीळ आयसोटोप मानला जातो. याचे संशोधन नेचर जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले असून, या माध्यमातून संशोधकांमध्ये व तज्ज्ञांमध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे. वुडस होल ओशनोग्राफिक इन्स्टिट्यूशन आणि कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या भूगर्भ शास्त्रज्ञांच्या संयुक्त पथकाने बाफिन बेटावरील प्राचीन लाव्हावर संशोधन केले होते.
प्राचीन लाव्हामध्ये हेलियम-3 व हेलियम -4 आयसोटोप मिळाले असून, यात हेलियम-3 चे प्रमाण अधिक आहे. हेलियम-3 मुळातच अतिशय दुर्मीळ असून, जसा तो पटलावर येतो, तसा वातावरणात लुप्त होतो, असे मानले जाते. पृथ्वीच्या अंतर्भागातून हा घटक लीक होत असल्याचे चित्र असून, यामुळे ही अभ्यासाची नवी संधी देखील ठरते आहे.

SCROLL FOR NEXT