Latest

बुलडाणा : मेहुणीवर जडला जीव! लग्नाची मागणी नाकारल्याने सासू आणि मेहुणीवर जावयाचा कोयत्याने हल्ला

मोनिका क्षीरसागर

बुलडाणा, पुढारी वृत्तसेवा : पत्नीच्या धाकट्या बहिणीवर एकतर्फी जीव जडलेल्या जावयाने, तिचेही लग्न माझ्याशी लावून द्या असा हट्ट सासूकडे धरला. पण ही विचित्र मागणी वृद्ध सासू व मेहुणीनेही नाकारली. यामुळे चिडलेल्या जावयाने सासू व मेहुणीवर कोयत्याने वार करून दोघींनाही जखमी केले. खामगाव शहरालगतच्या एका गावात ही घटना घडली. प्राप्त तक्रार व वैद्यकीय अहवालावरून खामगाव ग्रामीण पोलीसांनी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित वृद्ध महिलेच्या थोरल्या मुलीचा विवाह जळगाव जिल्ह्यातील एका गावातील तरूणाशी काही वर्षापूर्वी झाला आहे. दरम्यान पत्नीच्या धाकट्या बहिणीवर त्याचा एकतर्फी जीव जडला होता. तिच्यासोबत माझी लग्नगाठ बांधून द्या अशी मागणी सासूकडे करत, मेहुणीला त्याच्यासोबत येण्याचा आग्रह धरला. या दोघींनीही जावयाचा प्रस्ताव नाकारला. यावेळी तिघांमध्ये जोरदार वाद झाला.

अखेर चिडलेल्या जावयाने सासूवर कोयत्याने वार केला. हा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या मेहुणीवरही त्याने वार केले. यात दोघीही गंभीर जखमी झाल्या असून, त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT