Latest

T20 World Cup : अफगाणिस्तानचा संघ जाहीर, आशिया कपमधील पाच खेळाडूंना डच्चू

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : T20 World Cup : अफगाणिस्तान क्रिकेट संघाने आगामी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी 15 खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. आशिया कप स्पर्धेच्या सुपर 4 फेरीपर्यंत धडक मारलेल्या या संघाचे नेतृत्व पुन्हा एकदा मोहम्मद नबीकडे सोपवण्यात आले आहे. 15 मुख्य खेळाडूंव्यतिरिक्त, अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने चार अतिरिक्त खेळाडूंचा स्टँडबाय खेळाडू म्हणून समावेश केला आहे.

एसीबीने समिउल्ला शिनवारी, हशमतुल्ला शाहिदी, अफसर झझाई, करीम जनात आणि नूर अहमद यांना वगळले आणि त्यांच्या जागी मधल्या फळीतील फलंदाज दरविश रसुली, लेग-स्पिन अष्टपैलू कैस अहमद आणि उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज सलीम सैफी यांना 15 खेळाडूंच्या संघात स्थान दिले.

अफगाणिस्तानचा संघ असा :

मोहम्मद नबी (कर्णधार), नजीबुल्ला झदरन (उपकर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), अजमातुल्ला उमरझाई, दरवेश रसुली, फरीद अहमद मलिक, फजल हक फारुकी, हजरतुल्ला झाझाई, इब्राहिम झदरन, मुजीब उर रहमान, नवीन अहमद हक, कैस अहमद, राशिद खान, सलीम साफी, उस्मान गनी

स्टँडबाय खेळाडू : अधिकारी झाझई, शराफुद्दीन अश्रफ, रहमत शाह, गुलबदिन नायब

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT