Latest

Melanistic Tiger : ओडिशामध्ये दिसला अत्यंत दुर्मिळ ‘मेलानिस्टिक’ वाघ; पाहा व्हिडिओ

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Melanistic Tiger : ओडिशाच्या जंगलात अत्यंत दुर्मिळ मेलानिस्टिक वाघ आढळला आहे. या वाघाचा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल झाला आहे. ओडिशातील एका IFS अधिकाऱ्याने हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यानंतर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

मेलानिस्टिक वाघ म्हणजे काय?

सामान्यपणे वाघ म्हटले की आपल्या डोळ्यासमोर चित्र उभे राहते ते पट्टेदार वाघाचे. पट्टेदार वाघ हा सामान्यपणे सर्वत्र आढळतो. मात्र काही वाघांच्या प्रजाती या दुर्मिळ असतात. मेलानिस्टिक वाघ हा त्यापैकीच एक दूर्मिळ प्रजाती आहे. या वाघांच्या त्वचेवर किंवा केसांवर अतिशय गडद रंगद्रव्याची उच्च पातळी असते. त्यामुळे हे वाघ काळेभोर दिसतात. असा वाघ हा दूर्मिळ असतो.

Melanistic Tiger : ओडिशाच्या सिमिलीपाल व्याघ्र प्रकल्पात दिसला मेलानिस्टिक वाघ

भारतीय वनसेवा अधिकारी रमेश पांडे यांनी ट्विटरवर या मेलेनिस्टिक वाघाचा व्हिडिओ शेअर केला आहे. ओडिशातील सिमिलापाल व्याघ्र प्रकल्पात हा वाघ दिसला आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये, IFS रमेश पांडे यांनी लिहिले, "सिमिलीपाल टायगर रिझर्व्ह, ओडिशातील एका मेलेनिस्टिक वाघाचा सुंदर कॅमेरा ट्रॅप व्हिडिओ, लोकसंख्येतील अनुवांशिक उत्परिवर्तनामुळे आपल्याला काळेभोर वाघ दिसतात."

रमेश पांडे यांनी ही पोस्ट 1 ऑगस्टला शेअर केली आहे. पोस्ट केल्यापासून ती 66,000 पेक्षा जास्त वेळा पाहिली गेली आहे. तर 1600 हून अधिक लाईक्स त्याला मिळाले आहेत. तसेच अनेकांनी पोस्टवर कमेंट्स टाकल्या आहेत.

एकाने कमेंटमध्ये लिहिले आहे की अशा प्रकारच्या वाघाबद्दल पहिल्यांदाच माहिती होत आहे. आम्ही येथे भेट देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ शेअर केल्याबद्दल धन्यवाद.

तर अन्य एकाने मेलानिस्टिक वाघ व्वा, मी कधीही असा वाघ पाहिला नाही ज्याच्या त्वचेवर असे गडद काळे पट्टे आहेत.
तर काहींनी अश्विसनीय, वाव अशा काही प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT