Latest

कौतुकास्पद ! सख्ख्या बहिणी बनल्या प्रशासकीय अधिकारी

अमृता चौगुले

संगमनेर : गोरक्ष नेहे :  कुठल्याही परिस्थितीत आपल्याला प्रशासकीय अधिकारी व्हायचं आहे, अशी मनाशी खूणगाठ बांधत प्रणाली आणि संध्या फापाळे या दोन सख्ख्या बहिणींनी जिद्दीने अभ्यास केला आणि घरातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सुयश मिळविले. प्रणाली ही विक्रीकर निरीक्षक तर संध्या ही मंत्रालयीन लेखनिक बनली आहे. अकोले तालुक्यातील लिंगदेव येथील मूळचे रहिवासी असणारे व सध्या संगमनेर शहरातील घोडेकर मळ्यात स्थायिक झालेले देविदास फापाळे यांनी मालपाणी इंडस्ट्रीमध्ये सुपरवायझर तसेच डॉ. सुधीर तांबे यांच्या हॉस्पिटलमध्ये अनेक वर्ष आरोग्य सेवक म्हणून काम केले. फापाळे दापत्यांनी मोलमजुरी करून अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत मुलगा ईश्वर मुलगी प्रणाली व संध्या या तीन ही मुलांना उच्च शिक्षित केले.

प्रेरणा व संध्या या दोन्ही मुलींचे प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संगमनेर येथेच झाले. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण पुण्यात झाले प्रेरणा हिला डॉक्टर व्हायचे होतेपण तिचा सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात नंबर लागला नाही म्हणून ती नाराज झाली. आपली परिस्थिती नाजूक असल्यामुळे खासगी महाविद्याल यात डोनेशन भरण्यास पैसे नव्हते म्हणून तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. मात्र आता आपण प्रशासकीय सेवेत गेले तर आपले प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न निश्चितच पूर्ण होईल, अशी मनाशी खूणगाठ बांधत प्रशासकीय सेवेत जाण्याचा निर्णय घेतला आणि तिने महा राष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. आठव्या प्रयत्नात अखेर तिला यश आले आणि ती विक्रीकर निरीक्षक या पदाची परीक्षा उत्तीर्ण झाली. तिचे विक्रीकर निरीक्षक होण्याचे स्वप्न साकार झाले.

संध्या फापाळे हिने पद्युत्तर शिक्षण घेत ल्यानंतर तिचे लग्न झाले. परंतु घरातील कौटुंबिक वादामुळे बहीण प्रेरणा ही जशी प्रशासकीय अधि कारी झाली तसेच आपणही अधिकारी बनवून स्वतः च्या पायावर उभी राहू शकते, असे तिने मनाशी पक्के ठरवले. कुठल्याही प्रकारचा क्लास न लावता अभ्यासाला सुरुवात केली. अभ्यासात सातत्य ठेवल्यामुळे तसेच बहिणीचे मार्गदर्शन घेतल्याने ती पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाली आणि तिची मंत्रालय लेखनिक या पदावर नियुक्ती झालेली आहे.
आम्ही केलेल्या संघर्षाचे आणि कष्टाची चीज झाले असल्याची भावना प्रशासकीय अधिकारी बनलेल्या प्रेरणा व संध्या फापाळे यांचे वडील देविदास फापाळे व आई अलका फपाळे यांनी व्यक्त केल्या.

क्लास वन होण्यासाठी प्रयत्न करणार
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून प्रणाली फापाळे हिने वर्ग 2 तर संध्या फापाळे हिने वर्ग 3 या पदावर नियुक्ती झालेली आहे. मात्र आम्ही दोघी यावर न थांबता क्लास वनची पोस्ट कशी मिळेल. या दृष्टीने प्रयत्न करणार आहे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून कोणतेही परिस्थितीत आम्ही दोघी क्लास वन अधिकारी होणारच असा मनाशी पक्का निश्चय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून विक्रीकर निरीक्षक झालेल्या प्रणाली देविदास फापाळे आणि मंत्रालय लेखनिक बनलेल्या संध्या फापाळे यांनी दैनिक 'पुढारी' शी बोलताना सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT