Latest

Manoj Ghorpade : ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’, वडापावची गाडी चालविणारे गीतकार, चिमुकले गायक प्रसिद्धीपासून दूर

अविनाश सुतार

भिवंडी:  सध्या कोणत्याही गोष्टीला प्रसिद्धी मिळण्यासाठी समाज माध्यमांवर पोस्ट टाकणे गरजेचे झालेला आहे. सध्या गणेशोत्सवाच्या तोंडावर 'आमच्या पप्पांनी आणले गणपती' या गाण्याचा व्हिडिओ धुमाकूळ घालत आहे. त्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील साईराज केंद्रे हा मुलगा प्रत्येकांच्या घरोघरी पोहोचला. नव्हेच तर हे गाणं सर्व आबालवृद्धांच्या तोंडी रेंगाळू लागले. पण या गाण्याचे गीतकार आणि चिमुकले गायक प्रसिद्धी पासून अद्यापही दूर आहेत. (Manoj Ghorpade)

Manoj Ghorpade : वडापाव गाडीवर व्यवसाय करून उदरनिर्वाह

भिवंडी शहरालगतच्या राहनाळ ग्रामपंचायतमधील चरणी पाडा अंजूर फाटा येथे वडिलांच्या वडापावच्या गाडीवर मदत करणारा मनोज घोरपडे या गाण्याचे गीतकार आहेत. त्यांचा चिमुकला मुलगा मोहित उर्फ माऊली व मुलगी शौर्या हे दोघे या गाण्याचे गायक आहेत. मध्यमवर्गीय घोरपडे कुटुंबीय वडापावच्या गाडीवर व्यवसाय करून उदरनिर्वाह करीत आहेत. त्यासोबत मनोज याने आपल्या गीत लेखनाचा छंद जोपासला आहे. मागील चार वर्षांपूर्वी त्याने आमच्या पप्पांनी आणला गणपती, हे गाणे लिहिले होते. हे गाणं लहान मुलांच्या आवाजात चांगलं वाटेल म्हणून त्यांनी आपल्या दोन्ही मुलांकडूनच सराव करून घेत हे गाणं 2022 मध्ये गाऊन घेतले. (Manoj Ghorpade)

सुरुवातीला त्याला दोन मिलियन मिळाले होते. परंतु, बीड जिल्ह्यातील साईराज केंद्रे याने या गाण्यावरील व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर या गाण्याला तब्बल साडेसहा मिलियन व्हूज मिळाले आहेत. आपल्या गाण्याला मिळालेल्या यशाबद्दल आनंद असल्याचे मनोज सांगत आहे. परंतु, आपल्याला प्रसिद्धी मिळाली नसल्याची खंत त्याच्या देहबोलीवरून दिसून येत आहे.

साईराज केंद्रेच्या व्हिडिओला तब्बल सहा मिलियन व्हूज

मागील वर्षी बनविलेल्या या गाण्याला वर्षभरात दोन मिलियन व्हूज मिळाले होते. पण साईराज केंद्रेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मागील काही दिवसांत हे गाणे पाहणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली. ती संख्या तब्बल सहा मिलियन व्हूज वर जाऊन पोहोचली आहे.
मनोजने नवरात्रीत शौर्याकडून " गरबा नाचायला आली मम्मीच्या संगे " हे गाणे गाऊन घेतले. स्वतः कोणतीही गायन कला आत्मसात केली नसताना उडत्या चालीवरील गाणी आपल्या मुलांच्या आवाजात शब्दबध्द करण्यात आनंद असल्याचे मनोज यांनी सांगितले.

'गणपती येणार आमच्या घराला, दहा दिवसांची मजा करायला', हे गाणे मोहित, शौर्य व भाचा हृदय बुरुड यांच्या आवाजात गाऊन घेतले आहे. हे गाणे गणेशोत्सवाच्या आधी रिलिज करण्यात येणार आहे. हे गाणे पहिल्या गणपती गाण्या सारखेच लोकप्रिय होईल, असा विश्वास मनोज घोरपडे यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT