Latest

Sexual Torture : दीपिकापासून ते सोनमपर्यंत ! बॉलिवूडच्या ‘या’ ८ अभिनेत्रींचा झाला हाेता लैंगिक छळ

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशात दिवसेंदिवस लैंगिक छळाच्‍या (Sexual Torture ) घटनेत वाढ होत आहे. या घटनेत सामान्य महिलापासून ते बॉलिवूडमधील दिग्गज स्टार्सचा देखील समावेश आहे. काही वेळा या घटनेचा खुलासा हाेताे. तर कधी त्यावर पडदा टाकला जातो.  जाणून घेवूया लैंगिक शोषणाच्या ( Sexual Torture ) बळी ठरल्या बॉलिवूडमधील अभिनेत्री .

बिपाशा बासू (Bipasha Basu)

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासूने 'जिस्म' चित्रपटाच्या प्रमोशनवेळी आणि मुंबईतील एका नाईट क्लबमध्ये लैंगिक शोषणास बळी ठरल्याचे सांगितले हाेते. याबाबत माहिती देताना बिपाशा म्हणाली हाेती, एके दिवशी आम्ही मुंबईतील एका नाईट क्लबमध्ये गेलो होतो. तेव्हा अचानक अनोळखी व्यक्तीने मला छेडछाड केली आणि पळून जावू लागला. यावेळी बिपाशासोबत असलेल्‍या जॉनने त्या व्यक्तीला पकडले. यानंतर आम्ही दोघांनी मिळून त्याला पोलिसांच्या हवाली केले.

दीपिका पादुकोण (Deepika Padukone)

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने वयाच्या १४-१५ वर्षाची असताना लैंगिक शोषणास बळी ठरल्याचे खुलासा केला  हाेता. या घटनेविषयी माहिती देताना दीपिका म्हणाली की, 'मला आठवते की, एका रेस्टॉरंटमधून जेवण करून संध्याकाळच्या सुमारास माझे कुटुंब आणि मी रस्त्यावर जात होतो. तेव्हा माझी बहीण आणि माझे वडील रस्त्याने पुढे चालत होते. आणि याचदरम्यान माझी आई आणि मी पाठीमागून निघालो होतो. यावेळी एका अनोळखी व्यक्तीने मला पाठीमागून छेडछाड करत होता. यावेळी पहिल्यांदा मी चुकून झाले असेल म्हणून गप्प बसले पंरतु, वारंवार असे होवू लागल्याने मला राग आला आणि मी त्या अनोळखी व्यक्तीचा शर्टची कॉलर पकडली आणि रस्त्यात कानाखाली मारली. या घटनेनंतर आम्ही तेथून निधून गेलो.

फातिमा सना शेख (Fatima Sana Shaikh)

'दंगल' फेम आणि बॉलिवूड अभिनेत्री फातिमा सना शेख कायमच आपल्या वैयक्तीक आयुष्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. गेल्या काही दिवसापूर्वी तिच्या विवाह आणि बलिवूडमधून ब्रेक घेतल्याच्या वृत्तामुळे चर्चेत आली होती. या दरम्यान फातिमा सना शेखने तीन वर्षाची असताना लैंगिक शोषणास बळी ठरल्याचे एका मुलाखतीत सांगितले होते.

कल्कि कोचलिन (Kalki Koechlin)

बॉलिवूड अभिनेत्री कल्की कोचलिनने एका टीव्ही मुलाखती दरम्यान लैंगिक शोषणास बळी ठरल्याचा खुलासा केला होता. यात तिने ९ वर्षांची असताना एका अनोळखी व्यक्तीने छेडछाड केल्याची घटना घडली असल्याचे सांगितले होते. या घटनेनंतर मी खूपच घाबरले हाेते, असेही तिने म्‍हटले हाेते.

सोनम कपूर (Sonam Kapoor)

बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री सोनम कपूरनेला देखील वयाच्या १३ वर्षीच लैंगिक अत्याचाराचा सामना करावा लागला होता. या घटनेबद्दल तिने एका मुलाखतीत सांगितले की, मुंबईतील गायटी गॅलेक्सी थिएटरमध्ये ही घटना घडली. या थिएटरमध्ये एक अनोळखी व्यक्तीने मला स्पर्श करू लागला. यानंतर मी खूपच घाबरली आणि जोरजोरात रडू लागली. यावेळी मला काहीही बोलता आले नाही.

स्वरा भास्कर (Swara Bhasker)

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने एका मुलाखतीत लैंगिक शोषणास बळी ठरल्याचा खुलासा केला हाेता. यावेळी  सुरक्षा रक्षक असून देखील राजकोट विमानतळावर 'प्रेम रतन धन पायो' च्या शूटिंग दरम्यान छेडछाड झाल्याचे  सांगितले हाेते.  या घटनेदरम्यान स्वरा भास्करच्या मदतीला अनुपम खेर आले असल्याचे तिने म्‍हटलं हाेतं.

सुष्मिता सेन (Sushmita Sen)

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने एका १५ वर्षाच्या मुलाने पुरस्कार सोहळ्यात छेडछाड केल्याचा खुलासा मुलाखती दरम्यान केला हाेता.  १५ वर्षाच्या मुलगा माझी छेड काढून  गर्दीत पळून जात होता. यावेळी त्याला शर्टच्या कॉलरला पकडून गर्दीतून बाहेर काढत आम्ही पोलिसांच्या ताब्यात दिले हाेते, असे तिने म्‍हटलं हाेतं.

झायरा वसीम (Zaira Wasim)

बॉलिवूड अभिनेत्री झायरा वसीमने दिल्ली आणि मुंबई दरम्यानच्या विमान प्रवासात एका मध्यम वर्गीय व्यक्तीने विनयभंग केल्याचा खुलासा केला आहे. या घटनेबद्दल बोलताना झायरा म्हणाली की. जेव्हा मी विमानात झोपली होती, तेव्हा एका अनोळखी व्यक्तीने माझ्या पायांना अयोग्य पद्धतीने स्पर्श केला होता. वरील बॉलिवूड स्टार्स लैंगिक शोषणाच्या ( Sexual abuse ) बळी ठरल्या आहेत.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT