Latest

Life Style Safety Jeans : आणीबाणीच्या प्रसंगात ‘जीन्स’ करेल तुमची सुरक्षा, दिल्लीच्या विद्यार्थीनींनी तयार केली ‘सेफ्टी जीन्स’

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Life Style Safety Jeans : शहर असो का ग्रामीण भाग महिलांना घर असो का घराबाहेर स्त्री ला स्वतःच्या सुरक्षेसाठी नेहमीच संघर्ष करावा लागतो. महिलेवर एखादा आणीबाणीचा प्रसंग कधी ओढवेल हे सांगता येत नाही. सरकार, तसेच अन्य शासकीय-निमशासकीय संस्था असे प्रसंग रोखण्यासाठी प्रयत्नशील असतात. तरीही अनेक वेळा अनेक महिलांना अशा प्रकारच्या अति प्रसंगांना सामोरे जावे लागते. अगदी लहान चिमुकल्यांसह ज्येष्ठ महिला कोणावरही असा प्रसंग ओढावू शकतो.

अशा प्रसंगांपासून स्वतःला वाचवण्यासाठी आता तुम्हाला आणखी एक पर्याय दिल्लीतील दोन विद्यार्थीनींमुळे उपलब्ध होणार आहे. या विद्यार्थ्यीनींनी आपल्या शिक्षिकेच्या मार्गदर्शनात तंत्रज्ञानाचा उत्तम वापर करून अशी जीन्स (Life Style Safety Jeans) तयार केली आहे. जी तुम्हाला आणीबाणीच्या प्रसंगात सुरक्षा पोहोचवण्यात मदत करेल. ते सुद्धा फक्त एका बटणाद्वारे. दिल्लीतील मैक्सफोर्ट शाळेच्या विद्यार्थीनींनी ही 'सेफ्टी जीन्स' तयार केली आहे. रिदिमा दयाल आणि कशिश अशी या विद्यार्थिनींनची नावे आहेत. त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रियंका यांच्या मदतीने ही जीन्स तयार केली आहे.

life style safety jeans 1

Life Style Safety Jeans : अशी आहे सेफ्टी जीन्स

ही जीन्स सामान्यपणे दिसणा-या जीन्सप्रमाणेच असते. मात्र, तरीही ती विशेष आहे. या जीन्सच्या बटनमध्ये ब्लू टूथ नॅनो डिवाइस बसवण्यात आले आहेत. हे ब्लू टूथ डिवाइस अगदी सहजपणे तुमच्या मोबाईल फोनशी कनेक्ट होते. तुम्ही या बटनला टच केल्यानंतर लगेचच अॅक्टिवेट होईल. तुमच्या फोनमधील तीन नंबरला अलर्ट सेंड करेल. जेणेकरून तुमच्या नातेवाइकांना तुम्ही अडचणीत आहात हे समजेल. तसेच या डिवाइसमुळे तुमचे लोकेशन सहज ट्रॅक करता येईल. महिला सुरक्षेसाठी तयार केलेल्या या जीन्सला सरकार किंवा कोणत्या कंपनीचा सहयोग मिळाला तर लवकरच ही जीन्स बाजारात लाँच केली जाईल.

Life Style Safety Jeans : सेफ्टी ब्लू टूथ डिवाइची वैशिष्ट्ये

या जीन्समध्ये लावण्यात आलेल्या ब्लू टूथ डिवाइसची काही खास वैशिष्ट्ये आहेत. पहिले म्हणजे हे सहजपणे काढता येते. जेणेकरून तुम्ही हे बटन काढून जीन्स धुवू शकता तसेच दुस-या कोणत्याही ड्रेस किंवा कपड्यांमध्ये त्याला अॅटॅच करू शकतात. त्यामुळे फक्त जीन्सच नाही तर अन्य कोणत्याही कपड्यात तुम्ही सुरक्षित व्हाल. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे या डिवाइसला अवघ्या एका तासात पूर्ण चार्च करू शकतात. फक्त एका तासाच्या चार्जिंगमध्ये हे डिवाइस 7 दिवस चालू शकते.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT