Latest

वंदे भारत सुसाट!

Arun Patil
जगभरात असे म्हटले जाते की, रेल्वेच्या प्रगतीतूनच देशाचा विकास साध्य होऊ शकतो. आजच्या काळात रेल्वेच्या विकासाची गरज ही अस्तित्वाशी जोडली गेली आहे. पृथ्वीला उष्ण करणार्‍या वायूप्रदुषणामुळे जगाची अधोगती होत आहे. कार्बन गॅसचे उत्सर्जन कमी करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. यासाठी रस्त्यावरील वाहतूक कमी करून वीजेवर, सौरऊर्जेवर धावणार्‍या रेल्वेवाहतुकीचा विचार केंद्रस्थानी आला आहे. भारत या दिशेने वेगाने काम करत आहे. 'वंदे भारत' रेल्वेची रचना आणि निर्मिती याचे काम भारतातच होत आहे.
देशात वेगाने धावणार्‍या आणि भारतीयांचा प्रवास वेगवान करणार्‍या वंदे भारत रेल्वेचा आराखडा आणि त्याची बांधणी हे सर्वकाही भारतात होत आहे. परिणामी आर्थिक बचतही होत आहे आणि देश आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे. वंदे भारत सारखी रेल्वे आयात करण्यासाठी आपल्याला पूर्वी 300 कोटी रुपये खर्च करावे लागत असत. आता देशात हीच रेल्वे देशात 97 कोटी रुपयांत तयार होत आहे.'वंदे भारत'ची उपयोगिता ही आपण विकसित देश जपानच्या उदाहरणावरून समजू शकतो. दुसर्‍या महायुद्धानंतर जपानची स्थिती खूपच ढासळली होती. मात्र जपान सरकारने आणि धोरणकर्त्यांनी देशात व्यापक प्रमाणात रेल्वे प्रकल्प हाती घेण्याची योजना आखली आणि त्यालाच पुढे बुलेट ट्रेन असे नाव मिळाले.
तत्कालीन काळात ही रेल्वे देशाचे चित्र बदलू शकते, असे म्हटले गेले आणि आर्थिकद़ृष्ट्या जपान जगातील आघाडीचा देश होईल, असेही सांगितले गेले. आणि घडलेही असेच. 1962 मध्ये ओसाका ते टोकिओदरम्यान धावणारी रेल्वे जगातील पहिली सर्वात वेगवान रेल्वे ठरली. याच जपानच्या मदतीने ही बुलेट ट्रेन आता भारतात मुंबईहून अहमदाबाद येथे धावण्याची तयारी करत आहे. एकुणातच देशाचा सर्वांगिण आर्थिक विकास हा रेल्वेमुळे शक्य झाला, असे जपानचे म्हणणे आहे.
स्वातंत्र्यानंतर 1950मध्ये भारतात प्रवासासाठी आणि मालवाहतुकीसाठी रेल्वेचा 80 टक्के वापर केला जात होता. सध्या प्रवासासाठी केवळ दहा टक्के तर मालवाहतुकीसाठी 27 टक्के रेल्वेचा वापर केला जात आहे. भारतात रस्त्यांची लांबी ही 63 लाख किलोमीटर आणि रेल्वेमार्गाची लांबी 65 हजार किलोमीटर. म्हणजेच रस्त्यांची लांबी ही रेल्वे मार्गापेक्षा जवळपासून शंभर पट अधिक आहे. तरीही रेल्वेतून 27 टक्के मालवाहतूक होत आहे. तुलना केल्यास एक रेल्वेमार्ग म्हणजे 27 रस्ते. वाहनांचे प्रदूषण कमी करण्यासाठी आजघडीला रेल्वेचे महत्त्व ओळखता संपूर्ण जगात रेल्वे क्षेत्राचा विकास करण्यावर प्रयत्न केले जात आहेत. भारतात राष्ट्रीय नव्या रेल्वे प्रकल्पानुसार 2030 पर्यंत रेल्वेमार्गाची क्षमता वाढविण्याचा प्रयत्न केला जात असून त्यानुसार सुमारे 47 टक्के लोक रेल्वेतून प्रवास करतील असे गृहित धरले आहे. तसेच मालवाहतुकीसाठीही रेल्वेचाच वापर व्हावा, याद़ृष्टीने प्रयत्न होत आहेत.

राष्ट्रीय नव्या रेल्वे प्रकल्पानुसार 2030 पर्यंत रेल्वेमार्गाची क्षमता वाढविण्याचा प्रयत्न केला जात असून त्यानुसार सुमारे 47 टक्के लोक रेल्वेतून प्रवास करतील असे गृहित धरले आहे. तसेच मालवाहतुकीसाठी देखील रेल्वेचाच वापर व्हावा, याद़ृष्टीने प्रयत्न होत आहेत. यानुसार 2050 पर्यंत हेच प्रमाण कायम ठेवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. कारण आर्थिक विकासासह रेल्वेची क्षमता वाढविली नाही तर हे प्रमाण कमी होऊ लागेल. 'वंदे भारत' रेल्वेची रचना आणि निर्मिती याचे काम भारतातच होत आहे. कमी किमतीत गाड्यांची निर्मिती केली जात असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारातही दुसर्‍यांशी स्पर्धा करत आहोत. कालांतराने परदेशातूनही ऑर्डर मिळू शकतात आणि भारत अशा रेल्वे निर्यातीचे केंद्र होऊ शकते. भारतात आजघडीला 34 वंदे भारत गाड्या धावत आहेत आणि या योजनेच्या पहिल्या टप्प्यांत चारशे वंदे भारत सोडण्याचे ध्येय आहे. वंदे भारत रेल्वेसंदर्भात वरवर मत मांडले तर ही श्रीमंतांची रेल्वे आहे, असे म्हटले जाते, पण वंदे भारतचे ध्येय हे समानता साध्य करण्याचे आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT