Latest

World Jellyfish Day : मेंदू नसूनही बुद्धिमान असते जेलिफिश!

Arun Patil

न्यूयॉर्क : दरवर्षी 3 नोव्हेंबरला 'जागतिक जेलिफिश दिवस' साजरा केला जात असतो. त्यानिमित्ताने या अनोख्या सागरी जीवाबाबतची माहिती लोकांना समजत असते. समुद्राच्या अथांग दुनियेत अनेक जीव असतात; ज्यांची आपल्याला माहितीही नसते. अशाच समुद्री जीवांमध्ये जेलिफिश ही सर्वात वेगळी प्रजाती आहे. कारण हा जीव गरम वा थंड पाण्यात, खोल समुद्रात किंवा अगदी समुद्राच्या किनार्‍यावर अशा कुठल्याही भागांमध्ये किंवा वातावरणामध्ये तुम्हाला दिसू शकतो. हवामान कसंही असू दे, थोडी सवय झाल्यानंतर, जेलिफिशला कुठल्याही प्रकारच्या वातावरणात सहज राहता येतं. हा जीव इतर अन्य समुद्री प्राणांपासून खूप वेगळा असतो. विशेष म्हणजे मेंदू नसूनही हा प्राणी बुद्धिमान असतो!

जेलिफिशचा आकार एखाद्या छत्रीप्रमाणे असून, त्याला तंतूंसारखे अनेक पाय असतात. या समुद्री जीवाला मेंदू आणि हृदय दोन्हीही नसले तरीही त्याला सर्वात हुशार जीव म्हटले जाते. जेलीफिशचा खेकडे, कोळंबी, मासे आणि समुद्रातील छोट्या वनस्पती हा आहार असतो. नोव्हेंबर महिन्यात पृथ्वीच्या भागात वसंत ऋतूचे आगमन होत असते. अशा हवामानामध्ये जेलिफिश पृथ्वीच्या दक्षिणी भागाच्या किनारपट्टीजवळ येत असतात.

जागतिक जेलिफिश दिवस 2014 पासून 3 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. जेलिफिश हा प्राणी डायनासॉरपेक्षाही खूप आधीपासून या पृथ्वीवर वास करतोय, असे म्हटले जाते. जेलिफिशमध्ये हृदय किंवा हाडं नसतात. असं असलं तरीही त्यांच्यात मज्जासंस्था आणि शरीराच्या मध्यभागी तोंड असतं. काही जेलिफिश हे अंधारात चमकतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT