Latest

जळगाव : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा काटा काढला

अविनाश सुतार

जळगाव: पुढारी वृत्तसेवा : चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना अमळनेर शहरातील मुंबई गल्लीत उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. आरोपीने सुरूवातीला पत्नीने गळफास घेतल्याचा बनाव केला. मात्र, तपासात हा बनाव उघडा झाला. याबाबत महिलेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून महिलेच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीला अटक करण्यात आली आहे. देविदास उर्फ सूर्यकांत आत्माराम चौधरी असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर योगिता देविदास चौधरी (वय ३५, अमळनेर) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे.

याबाबत अधिक अशी की, धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील वारूळ येथील माहेर असलेल्या योगिता चौधरी हिचा अमळनेरच्या देविदास उर्फ सूर्यकांत चौधरी याच्याशी विवाह झाला होता. मात्र, मुलबाळ नसल्याने दारूच्या आहारी गेलेल्या देविदासकडून सातत्याने चारित्र्यावरून संशय घेवून तो योगिताचा छळ करत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून पत्नी सुरत येथे नातेवाईकांकडे गेली होती. मात्र पतीकडून होणाऱ्या बदनामीला कंटाळून पुन्ही ती पतीकडे गैरसमज दूर करण्यासाठी आल्यानंतर गुरुवार (दि.८) देविदासने पत्नीचा गळा आवळला. मात्र प्रकरण अंगावर येईल म्हणून त्याने पत्नीने गळफास घेतल्याचा बनाव केला व ती गळफास घेताच खाली पडली, अशी माहिती दिली.

अन् संशय बळावला…

मयत विवाहितेचा भाऊ दिनेश आत्माराम चौधरी व इतरांना योगिताच्या गळ्यावर सर्व बाजूने दोरी आवळल्याचे व्रण दिसले. तसेच गळ्यावर ओरखडल्याच्या खुणा व नाकातून देखील रक्त येताना दिसल्याने संशय बळावला. शिवाय छताला कुठेच दोरी लटकलेली अथवा तुटलेली दिसली नाही. त्यामुळे योगिताचा खून झाल्याची खात्री दिनेशला झाली. यानंतर त्याने रात्री उशिरा अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्यानंतर आज (दि. ९) पहाटे पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे करीत आहेत.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT